Corona in kolhapur: 859 people discharged in Kolhapur district till date | Corona in kolhapur : नवे ५७ कोरोना रूग्ण, आजअखेर ८५९ जणांना डिस्चार्ज

Corona in kolhapur : नवे ५७ कोरोना रूग्ण, आजअखेर ८५९ जणांना डिस्चार्ज

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर ८५९ जणांना डिस्चार्जजिल्ह्यात नवे ५७ कोरोना रुग्ण

कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात ५ वाजेपर्यत ४४९ प्राप्त अहवालापैकी ३९१ निगेटिव्ह तर ५७ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. फक्त एक अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 1309 पॉझीटिव्हपैकी 859 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 424 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 57 पॉझीटिव्ह अहवालापैकी, गडहिंग्लज-5, हातकणंगले-1, करवीर-14, पन्हाळा-8, शाहूवाडी-1, शिरोळ-3, नगरपरिषदक्षेत्र-14, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 11 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 96, भुदरगड- 80, चंदगड- 154, गडहिंग्लज- 132, गगनबावडा- 7, हातकणंगले- 27, कागल- 59, करवीर- 81, पन्हाळा- 50, राधानगरी- 75, शाहूवाडी- 192, शिरोळ- 27, नगरपरिषद क्षेत्र- 178, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-123 असे एकूण 1281 आणि जिल्हा व राज्यातील 28 असे मिळून एकूण 1309 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 1309 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 859 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 26 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 424 इतकी आहे
 

 

Web Title: Corona in kolhapur: 859 people discharged in Kolhapur district till date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.