corona cases in kolhapur : सलग दुसऱ्या दिवशीही दोन हजारावर रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 08:38 PM2021-06-26T20:38:21+5:302021-06-26T20:41:22+5:30

corona cases in kolhapur : सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजारावर कोरोनाचे रूग्ण नोंदवण्यात आले आहेत. नवे २०४१ रूग्ण असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Corona cases in Kolhapur: Two thousand patients for the second day in a row | corona cases in kolhapur : सलग दुसऱ्या दिवशीही दोन हजारावर रूग्ण

corona cases in kolhapur : सलग दुसऱ्या दिवशीही दोन हजारावर रूग्ण

Next
ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशीही दोन हजारावर रूग्ण३३ जणांचा मृत्यू, ११६३ जणांची कोरोनावर मात

कोल्हापूर  : सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजारावर कोरोनाचे रूग्ण नोंदवण्यात आले आहेत. नवे २०४१ रूग्ण असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाने जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांचीही संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासात २२ हजार ९१६ चाचण्या करण्यात आल्या असून त्यातून २०४१ नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहरात ४३६, करवीर तालुक्यात ५३५ तर हातकणंगले तालुक्यात २९९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोल्हापूर, करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील मृतांचा आकडा कमी येण्याची चिन्हे नाहीत. कोल्हापूर शहरात सात, करवीर तालुक्यात आठ आणि हातकणंगले तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

तालुकावर मृतांची आकडेवारी

  • करवीर ०८

पाचगाव२, पाडळी खुर्द, कसबा आरळे, गोकुळ शिरगाव, नंदगाव, कसबा बावडा, साळोखेनगर

  • कोल्हापूर ०७

मंगळवार पेठ, राजारामपुरी २, नंगिवली चौक, शिवाजी पेठ, पाटोळेवाडी, आर. के. नगर, ताराबाई पार्क

  •  
  • हातकणंगले ०५

जुने चावरे, किणी, हुपरी, नवे चावरे, माणगाव

  •  
  • गडहिंग्लज ०३

अर्जुनवाडी, भडगाव, शिप्पूर तर्फ आजरे

  •  
  • पन्हाळा ०२

आरळे, पोहाळे

  • कागल ०१

लिंगनूर दुमाला

  • राधानगरी ०१

आवळी बुद्रुक

  • शिरोळ ०१

इचलकरंजी ०१

  • इतर जिल्हे ०४

बोरगाव, शिवपूरवाडी, ढवळी, रत्नागिरी

Web Title: Corona cases in Kolhapur: Two thousand patients for the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.