शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

‘फेसबुक’वर वादग्रस्त पोस्ट; तरुणास अटक

By admin | Updated: February 26, 2015 00:53 IST

औरंगाबादेत कारवाई : ‘दाभोळकर, पानसरे आता खेडेकर’.. असा उल्लेख; कोल्हापूर पोलिसांकडून चौकशी

कोल्हापूर : ‘खूब जमेगा रंग... जब मिलेंगे तीन यार... दाभोलकर, पानसरे आता खेडेकर...’ अशी वादग्रस्त पोस्ट ‘फेसबुक’वर टाकणाऱ्या औरंगाबाद येथील संशयित अमोल पाटील या तरुणास मंगळवारी रात्री कोल्हापूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पानसरेंच्या हत्येनंतर पोलिसांना शहरात पाच संशयास्पद मोटारसायकली मिळाल्या. त्या चोरीच्या असून त्या कोणत्या परिसरातून चोरीस गेल्या, त्या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलीस मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मारेकरी हे कोल्हापूर, सांगली व कर्नाटकातील असण्याचा कयास पोलिसांचा असून, त्यादृष्टीने पोलीस शोध घेत आहेत. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर पाटील याने ‘फेसबुक’वर ‘दाभोलकर, पानसरे आता खेडेकर, दाभोलकरांचे रेकॉर्ड मोडून पानसरे सर्वांत पुढे’ अशी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी पाटीलला ताब्यात घेऊन कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कसून चौकशी केली. अशा पद्धतीची पोस्ट का टाकली, त्यामध्ये तुझा काय हेतू होता. दाभोलकरनंतर पानसरे यांची हत्या होणार हे तुला माहीत होते का? आदी प्रश्न विचारले. तसेच त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्सही तपासण्यात येत असून, त्याच्या संपूर्ण वैयक्तिक जीवनाची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. चौकशीमध्ये त्याने दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. त्याला विशेष पोलीस महानिरीक्षकांसमोरही उभे करण्यात आले होते. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक गोयल यांनी अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये जखमी उमा पानसरे यांच्या प्रकृतीची विचापूस केली. डॉक्टरांच्या परवानगीनुसार त्यांच्याकडे मारेकऱ्यांनी कोणत्या रंगाची दुचाकी वापरली होती, याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी रंग काळा की पांढरा हे आठवत नसल्याचे सांगितले. त्या अजूनही धक्क्यातून सावरल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास पथकांकडून रोज माहिती घेण्याचे काम पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा करत आहेत. अद्यापही पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही परंतु हाती येणाऱ्या संशयास्पद माहितीची पोलीस अत्यंत बारकाईने खातरजमा करत आहेत. (प्रतिनिधी)