शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या गारुडाखाली हिंदू राष्ट्राची बांधणी

By admin | Updated: May 29, 2015 23:49 IST

किशोर बेडकीहाळ : शमशुद्दीन मुश्रीफ यांना भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : आपण निर्बुद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या अंधारयुगात प्रवेश केला आहे. जिथे राज्यघटनेशी विसंगत बाबींना प्रतिष्ठा मिळत आहे. विकास नावाच्या गारूडाखाली हिंदू राष्ट्र आणि मतांची बांधणी करणाऱ्या हुकुमशाहीचा हा उत्कर्षाचा काळ आहे. येथे आपल्यापुढे प्रश्न न विचारता जे घडतंय त्याला मूकसंमती देण्याला पर्याय नाही कारण हिंदुत्वाचा राजकीय शक्ती म्हणून वापर होत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी सध्याच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीवर टीका केली. शाहू स्मारक भवनात गुरुवारी भाई माधवराव बागल विद्यापीठाच्यावतीने बागल यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांना भाई माधवराव बागल पुरस्कार देण्यातआला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अ‍ॅड. अशोकराव साळोखे अध्यक्षस्थानी होते. शाल, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये पाच हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बेडकीहाळ म्हणाले, हिंदुत्वाच्या हुकूमशाहीची मुळे मुसोलिनी, हिटलर आणि त्यानंतर इस्रायलमधील समाज जीवनाखाली दडली आहेत. जिथे अल्पसंख्याकांना जगण्याचा हक्कच नाकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम्ही किती चांगले आहोत हे जगभर सांगत फिरत आहेत. शमशुद्दीन मुश्रीफ म्हणाले, पूर्वीच्या काळीही जातीय दंगली व्हायच्या, पण त्याचे स्वरूप तत्कालीन असायचे. १८५० नंतर मात्र बहुजन समाजाला जातीयवाद्यांमुळे आपले दमन होत असल्याची जाणीव होऊ लागली. १८९०मध्ये समाजक्रांतीच होईल, अशी परिस्थिती होती. अशा काळात जातीयवाद्यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी बहुजन समाजाला मुस्लिमांच्या मागे लावले. त्यामुळे जातीयवाद्यांवरील लक्ष विचलित झाले. या परिवर्तनवादी चळवळीला स्वातंत्र्यसंग्रामामुळे ब्रेक लागला. (प्रतिनिधी) ‘लोकमान्य’ पदवी का दिली?या व्याख्यानात दोन्ही वक्त्यांनी लोकमान्य टिळक आणि ‘केसरी’वर सडकून टीका केली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,’ अशी टिळकांनी घोषणा केली असली, तरी त्यांना अभिप्रेत असलेले स्वराज्य वेगळे होते. टिळकांनी नेहमी जातीयवाद्यांचा पुरस्कार केला. बहुजन आणि स्त्री शिक्षणाला विरोध करणाऱ्या टिळकांना ‘लोकमान्य’ ही पदवी दिलीच कशी ? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.