Kolhapur- शिक्षणाचा परीघ: हातकणंगले व्यवसायाभिमुख, गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांचा हब, देशभरातील विद्यार्थ्यांचा ओढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 18:03 IST2025-02-04T18:02:06+5:302025-02-04T18:03:15+5:30

सुहास जाधव पेठवडगाव : हातकणंगले तालुका हा व्यवसायाभिमुख शिक्षण व गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांचा हब मानला जातो. तालुक्यात प्राथमिक पासून ...

considered as a hub of business oriented and quality educational institutions is Hatkanangle taluka of Kolhapur district | Kolhapur- शिक्षणाचा परीघ: हातकणंगले व्यवसायाभिमुख, गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांचा हब, देशभरातील विद्यार्थ्यांचा ओढा

Kolhapur- शिक्षणाचा परीघ: हातकणंगले व्यवसायाभिमुख, गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांचा हब, देशभरातील विद्यार्थ्यांचा ओढा

सुहास जाधव

पेठवडगाव : हातकणंगले तालुका हा व्यवसायाभिमुख शिक्षण व गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांचा हब मानला जातो. तालुक्यात प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत विविध शाखांचे शिक्षण संस्था देणाऱ्या नामांकित संस्था कार्यरत आहेत. फक्त जिल्ह्यातील नाही तर राज्यभरातून विद्यार्थी तालुक्यात येत आहेत. शिक्षण संस्थांचे जाळे व वाढते शहरीकरण यामुळे तालुक्यात दिवसेंदिवस चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध असल्याने पालक, विद्यार्थ्यांची हातकणंगले तालुक्यातील संस्थांकडे ओढा वाढला आहे. 

येथील संस्थांनी आता उच्च शिक्षणासोबत युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. तालुक्यात डीवाय पाटील समूह, घोडावत समूह, रयत संकुल कुंभोज शाहू शिक्षण प्रसारक मंडळ, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ, बाळासाहेब माने शिक्षण संस्था, आदर्श संकूल सारख्या जुन्या व प्रतिष्ठित संस्थांनी मोठ्या प्रमाणात संस्थात्मक जाळे उभे केले आहे. यात हजारो शिक्षण घेत आहेत. वडगाव, पारगाव, वाठार, तळसंदे, मिणचे, अतिग्रे, हुपरी, हातकणंगले येथे मोठ्या संस्थांचे जाळे निर्माण झाले असून येथे दरवर्षी हजारो विद्यार्थी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण घेत आहेत. 

या भागात दोन खाजगी विद्यापीठाच्या माध्यमातून व्यावसायिक व अभियांत्रिकी शिक्षण दिले जात आहे.त्याच बरोबर वैद्यकीय, औषध निर्माण, नर्सिग, दंत महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण विद्यार्थी घेत आहेत. ज्या विद्यार्थीना व्यावसायिक शिक्षणाचा खर्च पेलत नाही.असे विद्यार्थी पारंपरिक (बीए बीकॉम,बीएससी ) शिक्षणाकडे वळत आहेत.नविन शैक्षणिक धोरण राबविताना महाविद्यालयांतील प्राधाध्याकाचा २५ टक्काहून अधिक जागा रिक्त आहेत. 

  • खासगी विद्यापीठे २(डी वाय पाटील विद्यापीठ, घोडावत विद्यापीठ)
  • शिक्षण शास्त्र महाविद्यालये २
  • डी एड विद्यालये १
  • आयुर्वेदिक महाविद्यालय २
  • दंत महाविद्यालय १
  • औषध निर्माण महाविद्यालय ४
  • इंजिनिअर काॅलेज : १
  • डिप्लोमा काॅलेज : १
  • नर्सिग १


महाविद्यालय - जागा - भरती - रिक्त - विद्यार्थी
पेठवडगाव आंबेडकर महाविद्यालय - १६ - १० - ०६ - ४००
पेठवडगाव यादव महाविद्यालय - ४५ - ३६ - ९ - १३००
हातकणंगले डांगे महाविद्यालय - १८ - १४ - ०४ -  ८००
रूकडी राजर्षी शाहू - १५ - १३ - ०२ - ३००
रयतेचे व जनता महाविद्यालय (हुपरी) - १८ - ११ - ०७ - ३००

जिल्हा परिषद शाळा १७७, रिक्त जागा २२ +,  मुख्याधिकारी ८, सह विशेष शिक्षक प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर विद्यालय ची संख्या ५५५
आठवीतील मुले ३.१५, मुली ६.०१ एकूण असे १.०३ गळतीचे प्रमाण आहे

समृद्ध भारत घडवायचा असेल तर ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थीना चालणा द्यायची असेल तर एकच अभ्यासक्रम राबवून शिक्षणातील दरी दूर करावी लागेल.याबरोबर केवळ पाठ्यक्रमातील अनुभवावर अवलंबून न राहता.विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याचा विकास करणे गरजेचे आहे.यातून येणारी पिढी आव्हाने स्वीकारण्यास सज्ज होईल.वेळोवेळी सुधारित शैक्षणिक धोरण राबविणे गरजेचे आहे. - डॉ. डी एस घुगरे, प्राचार्य आदर्श विद्यानिकेतन

Web Title: considered as a hub of business oriented and quality educational institutions is Hatkanangle taluka of Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.