आमदार पुढे आले प्रत्येक तालुक्यासाठी रुग्णवाहिका देण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 01:45 PM2020-05-24T13:45:30+5:302020-05-24T13:47:28+5:30

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही महापालिका क्षेत्रासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी पत्र दिले आहे. खासदार प्रा संजय मंडलिक आणि आमदार राजू आवळे यांनीही इतर यंत्रसामुग्री खरेदीसाठी निधी दिला आहे.आमदार फंडामधून या  रुग्णवाहिका लवकरच घेण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री पाटील म्हणाले.

Consent of Ambulance MLAs for funding for each taluka | आमदार पुढे आले प्रत्येक तालुक्यासाठी रुग्णवाहिका देण्यासाठी

आमदार पुढे आले प्रत्येक तालुक्यासाठी रुग्णवाहिका देण्यासाठी

Next
ठळक मुद्देआमदारांची निधीसाठी संमतीकागल आणि गडहिंग्लजमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेबांनी फौंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका दिली आहे.

कोल्हापूर :  कोवीड काळजी केंद्रासाठी आमदार फंडामधून प्रत्येक तालुक्यासाठी एक रुग्णवाहिका देण्यासाठी आमदार पुढे आले आहेत. यासाठी आपल्या फंडातून निधी
देण्यासाठी आमदारांनी संमती दिली आहे, अशी माहिती पालकमंत्री  सतेज पाटील यांनी आज दिली. जिल्ह्यामध्ये एकूण ४१ कोवीड काळजी केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये कोवीड- १९ चा प्रादुर्भाव होवू नये यासाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत आहे. या सर्व कोवीड काळजी केंद्रांसाठी सुविधा देण्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक रुग्णवाहिका देण्यासाठी आमदारांनी संमती दिली आहे.   

आमदार राजेश पाटील हे चंदगडसाठी, आमदार पी एन पाटील हे करवीरसाठी, आमदार चंद्रकांत जाधव आणि आमदार ऋतुराज पाटील हे महापालिका क्षेत्रासाठी, आमदार विनय कोरे हे शाहूवाडी, आमदार प्रकाश आवाडे हे इचलकरंजी ता. हातकणंगले, आमदार प्रकाश आबिटकर हे भुदरगड- राधानगरीसाठी, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिरोळसाठी रुग्णवाहिका देणार आहेत. मी इचलकरंजी नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रासाठी रुग्णवाहिका देणार आहे. सर्वांनी यासाठी निधी देण्यास संमती दिली आहे.
कागल आणि गडहिंग्लजमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेबांनी फौंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका दिली आहे. खासदर धैर्यशिल माने यांनीही सॅनिटायझरसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टर आणि फवारणी यंत्रासाठी निधी दिला आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही महापालिका क्षेत्रासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी पत्र दिले आहे. खासदार प्रा संजय मंडलिक आणि आमदार राजू आवळे यांनीही इतर यंत्रसामुग्री खरेदीसाठी निधी दिला आहे.आमदार फंडामधून या  रुग्णवाहिका लवकरच घेण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री पाटील म्हणाले.

Web Title: Consent of Ambulance MLAs for funding for each taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.