शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खेबुडकरांमुळे जगण्यात चेतना

By admin | Updated: July 29, 2014 00:03 IST

सर्वांच्या भावना : चेतना संस्थेच्यावतीने खेबुडकर यांचा हृद्य सत्कार

कोल्हापूर : अपंगमती व्यक्तींच्या जीवनात आनंद फुलवणारे, त्यांच्या श्रमाला मानसन्मान मिळवून देणारे, त्यांना स्वावलंबी बनवणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असलेले प्राचार्य पवन खेबुडकर यांचा आज, सोमवारी सेवानिवृत्तिनिमित्त हृद्य सत्कार करण्यात आला. खेबुडकर सरांनी आम्हाला विश्वास दिला आणि जगण्याची नवी दिशा दाखविली याबद्दल आम्ही त्यांच्या ऋणात राहू, अशा शब्दांत चेतना संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. शाहू स्मारक भवन येथे चेतना अपंगमती विकास संस्थेच्यावतीने प्राचार्य पवन खेबुडकर यांच्या सेवानिवृत्तिनिमित्त कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे उपस्थित होते. व्यासपीठावर ए. बी. राजमाने, संस्थेचे अध्यक्ष नरेश बगरे, दिलीप बापट, सुनील पाटील उपस्थित होते. सन्मानचित्र, मानपत्र देऊन खेबुडकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी खेबुडकर यांच्या कार्यगौरव विषेशांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. गण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत सोडणाऱ्या रिक्षामामांनी ‘चला चला पटपट जागेवर बसा’ हे गीत सादर केले. पालक, शिक्षकांनी ‘आज आम्ही विश्वासाने’ हे गीत गायले. विद्यार्थ्यांनी ‘हवे आम्हाला आकाशाचे गाणे’ या गीतावर नृत्य केले. त्यानंतर स्लाईड शोच्या माध्यमातून चेतना संस्थेची स्थापना, खेबुडकर यांनी २८ वर्षांच्या कारकिर्दीत केलेले कार्य, विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवतानाच त्यांच्यातील कलागुणांच्या विकासासाठी केलेले अथक परिश्रम याची माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेचे पहिले अध्यक्ष शरद नावरे यांनी खेबुडकर यांनी पालक व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला, असे सांगितले. पालक सुमती जोशी यांनी सरांमुळे आमचा मुलगा स्वावलंबी बनला, असे सांगत त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले. यानंतर विद्यार्थी वैभव जोगळेकर, अजया पाटील, राजश्री नाईक, डॉ. सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उज्ज्वला खेबुडकर व चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.