शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ‘गोकुळ’, ‘केडीसीसी’च्या जोडण्या; नेत्यांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यात घेतली सावध भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 17:06 IST

बालेकिल्ल्यात सावध भूमिका : नव्याने आकारास आलेल्या आघाड्यांमुळे संकेत

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रत्येक तालुक्यातील राजकीय समीकरणे पाहिली तर आगामी ‘गोकुळ’सह ‘केडीसीसी’ बँकेच्या निवडणुकीची नेत्यांनी पेरणी केल्याचे स्पष्ट होते. प्रमुख नेत्यांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यात सावध भूमिका घेत लावलेल्या जोडण्या पाहता आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होते.महापालिकेचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी रणांगण सुरू झाले आहे. महापालिकेच्या राजकारणाचा फारसा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होत नाही. पण, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या राजकारणाचे पडसाद थेट ‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’ बँकेवर उमटतात. महापालिका निवडणुकीत महाविकास व महायुती एकमेकांच्या विरोधात ताकदीने उभी राहिली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुती फिस्कटली, पण कोल्हापूर महापालिकेत ती एकसंध राहिली. तोच फाॅर्म्युला जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत दिसेल असे वाटत असतानाच, प्रत्येक तालुक्यात विचित्र आघाड्या झाल्या आहेत.

वाचा : माघारीची यंत्रणा भारी, साम, दाम, दंडाची तयारी; मंगळवारी होणार लढतींचे चित्र स्पष्टआगामी गोकुळ व केडीसीसी बँकेला कोणाची मदत घ्यावी लागणार, याचा अंदाज घेऊनच प्रत्येक ठिकाणी आघाड्या तयार झाल्या आहेत. करवीर, राधागरी, कागल, भुदरगड, पन्हाळा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यांत सर्वाधिक दूध संस्था आहेत. या तालुक्यांत झालेल्या आघाड्या पाहता हेच राजकारण दृढ करतात. काँग्रेसने काही तालुक्यांतील अपवाद वगळता आपल्या मित्र पक्षांना सोबत ठेवत मोट बांधली आहे. काँग्रेसने काही तालुक्यांत घेतलेली पूरक भूमिका पाहता, आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकीतील बेरजेचे राजकारण केल्याचे दिसून येत आहे.

‘राधानगरी’, ‘भुदरगड’मध्ये ‘सतेज’ यांच्या जोडण्या‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’ बँकेच्या राजकारणात पकड घ्यायची झाल्यास राधानगरी, भुदरगड, करवीर या तालुक्यांची भूमिका महत्त्वाची ठरते, हे ओळखूनच आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा गट काँग्रेसच्या झेंड्याखाली घेऊन आपली दिशा स्पष्ट केली. मंत्री मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांच्या कन्येला जिल्हा परिषदेची उमेदवारी देताना ‘गोकुळ’च्या राजकारणालाच महत्त्व दिले आहे. हाच फाॅर्म्युला आमदार चंद्रदीप नरके यांनी वापरून ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या मुलग्यास उमेदवारी देऊन शिंदेसेनेत घेतले.

कागलसह ‘गडहिंग्लज’ विभागात मुश्रीफ यांची बांधणीकागल तालुक्यात माजी आमदार संजय घाटगे, ‘शाहू’ ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना सोबत घेतले. गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा या तालुक्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणत त्यांनी बांधणी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Zilla Parishad Elections: Leaders Strategize for Gokul and KDCC Bank

Web Summary : Kolhapur Zilla Parishad elections reveal strategies for upcoming Gokul and KDCC bank polls. Leaders forge alliances, focusing on key milk-producing regions. Political dynamics in Radhanagari, Kagal, and Gadhinglaj are crucial for power in cooperative institutions.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळbankबँकPoliticsराजकारण