कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ‘गोकुळ’, ‘केडीसीसी’च्या जोडण्या; नेत्यांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यात घेतली सावध भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 17:06 IST2026-01-24T17:04:24+5:302026-01-24T17:06:26+5:30

बालेकिल्ल्यात सावध भूमिका : नव्याने आकारास आलेल्या आघाड्यांमुळे संकेत

Connections between Gokul and KDCC Bank in Kolhapur Zilla Parishad elections | कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ‘गोकुळ’, ‘केडीसीसी’च्या जोडण्या; नेत्यांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यात घेतली सावध भूमिका

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ‘गोकुळ’, ‘केडीसीसी’च्या जोडण्या; नेत्यांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यात घेतली सावध भूमिका

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रत्येक तालुक्यातील राजकीय समीकरणे पाहिली तर आगामी ‘गोकुळ’सह ‘केडीसीसी’ बँकेच्या निवडणुकीची नेत्यांनी पेरणी केल्याचे स्पष्ट होते. प्रमुख नेत्यांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यात सावध भूमिका घेत लावलेल्या जोडण्या पाहता आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होते.

महापालिकेचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी रणांगण सुरू झाले आहे. महापालिकेच्या राजकारणाचा फारसा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होत नाही. पण, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या राजकारणाचे पडसाद थेट ‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’ बँकेवर उमटतात. महापालिका निवडणुकीत महाविकास व महायुती एकमेकांच्या विरोधात ताकदीने उभी राहिली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुती फिस्कटली, पण कोल्हापूर महापालिकेत ती एकसंध राहिली. तोच फाॅर्म्युला जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत दिसेल असे वाटत असतानाच, प्रत्येक तालुक्यात विचित्र आघाड्या झाल्या आहेत.

वाचा : माघारीची यंत्रणा भारी, साम, दाम, दंडाची तयारी; मंगळवारी होणार लढतींचे चित्र स्पष्ट

आगामी गोकुळ व केडीसीसी बँकेला कोणाची मदत घ्यावी लागणार, याचा अंदाज घेऊनच प्रत्येक ठिकाणी आघाड्या तयार झाल्या आहेत. करवीर, राधागरी, कागल, भुदरगड, पन्हाळा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यांत सर्वाधिक दूध संस्था आहेत. या तालुक्यांत झालेल्या आघाड्या पाहता हेच राजकारण दृढ करतात. काँग्रेसने काही तालुक्यांतील अपवाद वगळता आपल्या मित्र पक्षांना सोबत ठेवत मोट बांधली आहे. काँग्रेसने काही तालुक्यांत घेतलेली पूरक भूमिका पाहता, आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकीतील बेरजेचे राजकारण केल्याचे दिसून येत आहे.

‘राधानगरी’, ‘भुदरगड’मध्ये ‘सतेज’ यांच्या जोडण्या

‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’ बँकेच्या राजकारणात पकड घ्यायची झाल्यास राधानगरी, भुदरगड, करवीर या तालुक्यांची भूमिका महत्त्वाची ठरते, हे ओळखूनच आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा गट काँग्रेसच्या झेंड्याखाली घेऊन आपली दिशा स्पष्ट केली. मंत्री मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांच्या कन्येला जिल्हा परिषदेची उमेदवारी देताना ‘गोकुळ’च्या राजकारणालाच महत्त्व दिले आहे. हाच फाॅर्म्युला आमदार चंद्रदीप नरके यांनी वापरून ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या मुलग्यास उमेदवारी देऊन शिंदेसेनेत घेतले.

कागलसह ‘गडहिंग्लज’ विभागात मुश्रीफ यांची बांधणी

कागल तालुक्यात माजी आमदार संजय घाटगे, ‘शाहू’ ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना सोबत घेतले. गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा या तालुक्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणत त्यांनी बांधणी केली आहे.

Web Title : कोल्हापुर जिला परिषद चुनाव: गोकुल और केडीसीसी बैंक के लिए नेताओं की रणनीति

Web Summary : कोल्हापुर जिला परिषद चुनाव आगामी गोकुल और केडीसीसी बैंक चुनावों के लिए रणनीतियों का खुलासा करते हैं। नेता गठबंधन बनाते हैं, प्रमुख दूध उत्पादक क्षेत्रों पर ध्यान केंद्रित करते हैं। सहकारी संस्थानों में शक्ति के लिए राधानगरी, कागल और गडहिंग्लज में राजनीतिक गतिशीलता महत्वपूर्ण है।

Web Title : Kolhapur Zilla Parishad Elections: Leaders Strategize for Gokul and KDCC Bank

Web Summary : Kolhapur Zilla Parishad elections reveal strategies for upcoming Gokul and KDCC bank polls. Leaders forge alliances, focusing on key milk-producing regions. Political dynamics in Radhanagari, Kagal, and Gadhinglaj are crucial for power in cooperative institutions.