शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा केंद्र बदलल्याने गोंधळ

By admin | Updated: December 2, 2014 00:15 IST

एम.ए.चा पेपर : प्रवेशपत्रात एक, तर प्रत्यक्षात दुसरेच केंद्र

कोल्हापूर : परीक्षा केंद्र बदलल्याची माहिती मिळाली नसल्याने शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण विभागाकडील एम.ए. भाग-एकच्या (इतिहास) विद्यार्थ्यांचा आज, सोमवारी गोंधळ उडाला. पेपरला दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी उरला असताना धावपळ करत संबंधित विद्यार्थ्यांना दुसरे परीक्षा केंद्र गाठावे लागले.दूरशिक्षण विभागाच्या एम. ए. (इतिहास) भाग एक या अभ्यासक्रमाची सध्या परीक्षा सुरू आहे. आज दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ‘प्राचीन भारतीय समाज, धर्म आणि संस्कृती’ या विषयाचा पेपर होता. शहरातील शहाजी कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर या विषयाच्या काही विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. पेपर सुरू होण्यास पंधरा ते वीस मिनिटांची अवधी बाकी असताना या केंद्रावर संबंधित पेपर होणार नसून येथील विद्यार्थ्यांची कमला कॉलेज याठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याची नोटीस फलकावर लावण्यात आल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. दोन ते सव्वा दोनच्या सुमारास आलेल्या विद्यार्थ्यांनी तातडीने रिक्षा तसेच आपल्या पालकांच्या वाहनांमधून गडबडीने कमला कॉलेज गाठले. अचानक केंद्र बदलल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. पेपरसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर शहाजी कॉलेज या परीक्षा केंद्राची नोंद होती. मात्र, प्रत्यक्षात दुसरेच केंद्रावर बैठक व्यवस्था असल्याचा समजातच त्यांची धावपळ झाली. केंद्र बदलाची अशी अचानक सूचना कशी देता असे काही विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता, त्यांना याठिकाणी विद्यापीठाने केंद्र बदलाचा ‘एसएमएस’ पाठविला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शहाजी कॉलेजमध्ये दूरशिक्षण विभागाच्या एम.ए.च्या तीनशे विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी बैठक व्यवस्था केली आहे. या कॉलेजला ७ व ८ डिसेंबरला ‘नॅक’ची समिती भेट देणार आहे. त्याच्या तयारीसाठी येथील परीक्षा केंद्र बदलून ते कमला कॉलेजमध्ये करण्यात आले. परीक्षा केंद्र बदलाची सूचनेचे एसएमएस दोनवेळा ‘एमकेसीएल’च्या माध्यमातून पाठविलेले आहेत. अचानक परीक्षा केंद्र बदललेले नाही. (प्रतिनिधी)