लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमअंतर्गत सर्वसमावेशक एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू झाली आहे. या नियमावलीबाबत बांधकाम व्यावसायिक व तांत्रिक सल्लागारांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस ॲन्ड इंजिनिअर्सने बुधवारी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
अध्यक्ष अजय कोराणे यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या नियमावलीबाबत सविस्तर माहिती कळावी व त्यातील नियमांचा अर्थ स्पष्ट व्हावा यासाठी शासनाच्या नगररचना विभागातर्फे निवृत्त साहाय्यक संचालक प्रकाश भुक्ते, सहसंचालक अविनाश पाटील तसेच वरिष्ठ अधिकारी, कोल्हापूर महापालिका, कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण, या विभागातील संबंधित तांत्रिक अधिकारी व आर्किटेक्ट, इंजिनिअर व बांधकाम व्यावसायिक यांच्यासोबत एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात यावी.
...........................