शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
5
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
7
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
8
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
10
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
11
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
12
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
13
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
14
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
15
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
16
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
17
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
18
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
19
PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती
20
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

कम्युनिटी पोलिसिंग योजना राबविणार :नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक वारके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:58 PM

समाजात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे आणि त्यांना पोलीस हा आपला जवळचा मित्र वाटला पाहिजे, अशा पद्धतीने ‘कम्युनिटी पोलीस’ योजना राबविणार असल्याचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्देकम्युनिटी पोलिसिंग योजना राबविणार :नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक वारकेनांगरे-पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला

कोल्हापूर : समाजात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे आणि त्यांना पोलीस हा आपला जवळचा मित्र वाटला पाहिजे, अशा पद्धतीने ‘कम्युनिटी पोलीस’ योजना राबविणार असल्याचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी येथे सांगितले.गुरुवारी ताराबाई पार्कातील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडून वारके यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नांगरे -पाटील यांची नाशिक येथे पोलीस आयुक्त या पदावर बदली झाली आहे.डॉ. वारके म्हणाले, जे काही समाजासाठी योग्य रीतीने करता येईल, त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. कडक शासन आणि गुन्हेगारांवर वचक हे माझ्या दृष्टीने प्राधान्य राहील. याचबरोबर कायदा, सुव्यवस्था आणि विविध आंदोलने योग्य पद्धतीने हाताळणार आहे.

सर्वसामान्य जनता डोळ्यांसमोर ठेवून कायद्याची अंमलबजावणी करणार आहे. तसेच परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा व सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण येथील अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधणार आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. नांगरे-पाटील यांनी पोलीस कल्याणासाठी यापूर्वी जे उपक्रम राबविले, तेच उपक्रम पुढे तसेच नवीन चांगले उपक्रमही सुरू करणार आहे. यावेळी वारके यांना पोलिसांसह नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.

वारके २००० च्या बॅचचे अधिकारीमी मूळचा जळगाव येथील. एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केले व औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ काम केले. २००० ला भारतीय प्रशासन सेवेत (आय.पी.एस.) दाखल झालो. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड पोलीस ठाणे येथे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून २००२ ला पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर किनवट (जि. नांदेड) येथे सहायक पोलीस आयुक्त, मालेगाव येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक, सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त, बीड जिल्हा पोलीस अधीक्षक, तर फेब्रुवारी २००९ मध्ये मुंबई परिमंडळ तीन व २०११ ला परिमंडळ दहाचे पोलीस आयुक्त म्हणून काम केले.राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये (एन.आय.ए) २०१२-१६ ला पोलीस उपमहानिरीक्षक या पदावर, तर २०१६ ला नागपूर शहरला अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम केले. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांची दोन पदके मिळाली आहेत. अमेरिकेत एफ. बी.आय. या प्रशिक्षण संस्थेत तीन महिने काम केले आहे. जुलै-आॅगस्ट २०१८ ला पोलीस महानिरीक्षक (आय. जी.) म्हणून बढती मिळाली. येथे येण्यापूर्वी मी मुंबईतील दहशतवादविरोधी पथकात (ए. टी. एस.) पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होतो, असे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक वारके यांनी यावेळी सांगितले. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर