वाणिज्य वृत्त - एस.एस. मोबाईलची बिग रिपब्लिक सेल योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:16 IST2021-02-05T07:16:28+5:302021-02-05T07:16:28+5:30

कोल्हापूर : एस. एस. मोबाईलच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त बिग रिपब्लिक सेल योजना जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत ग्राहकांना मेबाईल खरेदीवर ...

Commerce News - S.S. Mobile's Big Republic Sale Plan | वाणिज्य वृत्त - एस.एस. मोबाईलची बिग रिपब्लिक सेल योजना

वाणिज्य वृत्त - एस.एस. मोबाईलची बिग रिपब्लिक सेल योजना

कोल्हापूर : एस. एस. मोबाईलच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त बिग रिपब्लिक सेल योजना जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत ग्राहकांना मेबाईल खरेदीवर मोठी सूट, कॅशबॅक व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. ही योजना आज सोमवारी व मंगळवार असे दोन दिवस असेल.

योजनेंतर्गत स्मार्ट फोन खरेदीवर ४० टक्क्यांपर्यंत सूट, तसेच ब्ल्यूटूथ हेडफोन, स्मार्ट वॉच, कराओके स्पीकर, हेअर ड्रायर असे २ हजार ४९९ पर्यंतची हमखास भेटवस्तू दिली जाणार आहे. नामवंत कंपन्यांच्या इअर बडस, ब्ल्यूटूथ हेडफोन, पॉवरबॅक, स्मार्ट वॉच व अन्य ॲक्सेसरीजवर ७० टक्क्यांपर्यंत सूट आहे तसेच १०१ रुपये भरून शून्य टक्के व्याजदराने स्मार्ट फोन खरेदी करता येईल. स्टोअरच्या ४५ शहरांतील शंभराहून अधिक शाखांमध्ये ही योजना सुरू असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

फोटो नं २४०१२०२१-कोल-एस. एस. मोबाईल न्यूज फोटो

--

Web Title: Commerce News - S.S. Mobile's Big Republic Sale Plan