(वाणिज्य...) ‘संघवी’तर्फे लसीकरणासाठी मोफत वाहनसेवा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST2021-04-13T04:22:14+5:302021-04-13T04:22:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मंगळवारपेठेतील संघवी मीनाबाई पोपटलालजी शहा हॉस्पिटलच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना अत्यल्प दरात २४ ...

(Commerce ...) Free vehicle service available for vaccination by ‘Sanghvi’ | (वाणिज्य...) ‘संघवी’तर्फे लसीकरणासाठी मोफत वाहनसेवा उपलब्ध

(वाणिज्य...) ‘संघवी’तर्फे लसीकरणासाठी मोफत वाहनसेवा उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मंगळवारपेठेतील संघवी मीनाबाई पोपटलालजी शहा हॉस्पिटलच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना अत्यल्प दरात २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. तसेच रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असून कोविड लसीकरणासाठी रुग्णांना फाउंडेशनच्या वतीने मोफत वाहन सेवा उपलब्ध करून दिल्याची माहिती मंथन फाउंडेशन व रौनक फाउंडेशनचे रौनक शहा व रवींद्र वराळे यांनी दिली. जिल्ह्यात अडीच लाख लोकांनी लसीकरण करून घेतले असून अद्याप लसीकरण न झालेली संख्या मोठी आहे. यासाठी फाउंडेशनच्या वतीने जनजागृती करून मोफत वाहन सेवा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी संघवी मीनाबाई पोपटलालजी शहा हॉस्पिटलशी संपर्क साधावा, असे आवाहन रौनक शहा व रवींद्र वराळे यांनी केले आहे.

Web Title: (Commerce ...) Free vehicle service available for vaccination by ‘Sanghvi’