शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

(वाणिज्य..) महेंद्र ज्वेलर्सच्या वतीने ६० ‘ग्रेट ताईं’चा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:44 IST

कोल्हापूर : येथील महेंद्र ज्वेलर्स या सराफ पेढीच्या वतीने ११६ व्या वर्धापनदिनानिमत्त शनिवारी शाहू स्मारक भवनात आयोजित केलेल्या शानदार ...

कोल्हापूर : येथील महेंद्र ज्वेलर्स या सराफ पेढीच्या वतीने ११६ व्या वर्धापनदिनानिमत्त शनिवारी शाहू स्मारक भवनात आयोजित केलेल्या शानदार कार्यक्रमात ६० कर्तबगार महिलांचा ‘ग्रेट ताई’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

अनेक महिला नोकरी व व्यवसाय सांभाळत शेकडो किलोमीटर अंतर पार करत त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही उत्तमरीत्या पार पाडत आहेत. अशा कर्तबगार महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याच्या हेतूने महेंद्र ज्वेलर्सने अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. मधुरिमाराजे छत्रपती, भरत ओसवाल, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, चंद्रकांत ओसवाल, विजय ओसवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

कोल्हापूरच्या सराफ बाजारपेठेत ११५ वर्षांपूर्वी वरदाजी ओसवाल यांनी महेंद्र ज्वेलर्स या सराफा पेढीची पायाभरणी केली. शुद्धता आणि विश्वासार्हता जपत सोनमल ओसवाल यांनी त्यावर कळस चढविला तर भरत, चंद्रकांत, देविचंद आणि महेंद्र ओसवाल यांनी पेढीच्या विश्वासार्हतेची पताका पश्चिम महाराष्ट्रभर नेली. या कुटुंबीयांची चौथी पिढी सध्या महेंद्र ज्वेलर्सची धुरा उत्तमरीत्या सांभाळत असल्याचे गौरवोद्गार मधुरिमाराजे छत्रपती यांनी काढले, यावेळी राजू ओसवाल, नितेश ओसवाल, कुशल ओसवाल, मेहुल ओसवाल, अंकित ओसवाल आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : महेंद्र ज्वेलर्सच्या वतीने शनिवारी शाहू स्मारक भवनात कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी चंद्रकांत ओसवाल, संजय शेट्टे, मधुरिमाराजे छत्रपती, भरत ओसवाल आदी उपस्थित होेते. (फोटो-२००२२०२१-कोल-महेंद्र ज्वेलर्स) (छाया- आदित्य वेल्हाळ)