शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलरच्या पासिंगसाठी एकत्र या

By admin | Updated: September 15, 2014 00:41 IST

कृष्णात पाटील : ‘आयमा’च्या सभेत विविध विषयांवर चर्चा

शिरोली : ट्रेलरचे बंद पडलेले पासिंग पुन्हा सुरू करण्यासाठी उद्योजकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन महाराष्ट्र अ‍ॅग्रिकल्चर इम्पलीमेंट्रस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)चे अध्यक्ष कृष्णात पाटील यांनी केले. ते असोसिएशनच्या सभेत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी आॅल इंडिया अ‍ॅग्रिकल्चरचे सुरेंद्रसिंग होते. पाटील म्हणाले, ट्रेलरचे पासिंग ३१ आॅगस्टला बंद झाले आहे. पासिंग सुरू करण्यासाठी फक्त काही उद्योजकच आग्रही आहेत. बाकींच्या उद्योजकांना याचे कोणतेही देणे-घेणे नाही. पासिंग सुरू करण्यासाठी सर्वच उद्योजकांचा सहभाग आवश्यक आहे. ट्रेलरला ब्रेक सिस्टीम बसवावी, असा आदेश केंद्रीय दळणवळण व प्रादेशिक परिवहन सचिवांचा आहे. उद्योजकही ब्रेक सिस्टीम लावायला तयार आहेत, पण ट्रॅक्टर कंपन्यांनी ब्रेक सप्लाय पॉर्इंटच अद्याप काढलेले नाही. ट्रॅक्टरचे पासिंग शासनाने थांबवणे गरजेचे असताना ट्रेलरचे पासिंगच विनाकारण थांबविले आहे. यामुळे राज्यातील ट्रेलर उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे पासिंग सुरू करावे यासाठी १९ आॅगस्टला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट झाली असून त्यांनी यावर योग्य मार्ग काढू, असेही सांगितले आहे, पण यासाठी राज्यातील सर्व उद्योजकांचा सहभाग पाहिजे तरच ताकद लावून हे पासिंग पुन्हा सुरू होऊ शकते, असेही पाटील म्हणाले. या बैठकीला असोसिएशनचे सचिव व्यंकटराव मोरे, संपर्कप्रमुख युवराज चौगुले, सचिव दत्तात्रय हजारे, प्रकाश कुंभार, राजेंद्र मणियार, बंटी निकम, दीपक जाधव, बाबूराव हजारे, राहुरी कृषी विद्यापीठचे प्रकाश तुरमटकर, पुणे कृषी विद्यापीठचे एन. व्ही. राणे, श्रीकांत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ट्रेलर उद्योजक उपस्थित होते. (वार्ताहर)