शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

सहकार चळवळ मोडून काढण्याचा डाव

By admin | Updated: August 20, 2015 23:08 IST

सुनील तटकरे : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १४ सप्टेंबरपासून ‘जेल भरो’ आंदोलन

कोल्हापूर : राज्यातील भाजपचे सरकार हे शेतकरीविरोधी असून, सहकार चळवळ मोडून काढणे हाच कार्यक्रम घेऊन ते काम करीत आहे, असा घणाघाती आरोप गुरुवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. या बहिऱ्या सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.तटकरे म्हणाले, दहा महिन्यांपूर्वी राज्यात परिवर्तन होऊन १५ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसवर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर खचून न जाता पुन्हा नव्याने संघटना बांधण्यासाठी आपण राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात गाव आणि शहरातील पक्षाचे केडर मजबूत करण्याचा प्रयत्न राहणार आहे.राज्यातील भाजप सरकार शेतकरीविरोधी असून, सहकारी चळवळ मोडून काढण्याचा कार्यक्रम घेऊन ते काम करीत आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कार्यक्रम हाती घेऊन आंदोलन करणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण येथील शेतीविषयक व सामाजिक प्रश्न वेगवेगळे आहेत. ते समजून घेऊन पुढील दिशा ठरविली जाणार आहे. १४ व १५ सप्टेंबरला उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली या ठिकाणी ‘जेल भरो’ आंदोलन केले जाईल. गेल्या काही वर्षांत भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सरकारने ‘एसीबी’च्या माध्यमातून चौकशीही सुरू केली आहे. त्या चौकशीचे राष्ट्रवादीने स्वागत केले असून, सत्य काय आहे ते समोर येऊ दे, अशी पक्षाची भूमिका आहे. या चौकशीला सर्वच नेते सहकार्य करीत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाने त्यांना चांगल्या हेतूने मागासवर्गीय महामंडळावर संधी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखविला. त्याला कदम यांनी छेद दिला. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पक्ष कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेची भूमिका दुटप्पीसरकारमध्ये राहायचे आणि सरकारविरोधी भूमिका घ्यायची, अशी शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका तटकरे यांनी केली. हिंमत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हानही तटकरे यांनी दिले.