शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
2
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
3
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
4
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
5
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
6
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
7
Video - हृदयस्पर्शी! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना कुशीत घेऊन पळाली नर्स
8
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
9
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
10
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
11
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
12
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
13
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
14
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
15
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
16
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
17
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
18
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
19
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
20
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालय पहाटेपर्यंत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:29 IST

समीर देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील दिवे पहाटे तीनपर्यंत सुरू असलेले पाहावयास मिळत आहेत. नूतन ...

समीर देशपांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील दिवे पहाटे तीनपर्यंत सुरू असलेले पाहावयास मिळत आहेत. नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोरोना, महापूर यामुळे प्रलंबित असलेल्या फायलींचा निपटारा करण्यासाठी रात्रीचा दिवस करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मात्र कुचंबणा होत आहे. एकीकडे त्यांच्या गतिमान कारभाराची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे आम्ही रात्री कितीपर्यंत थांबायचे, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

शुक्रवारी (दि. १३) समाजकल्याण विभागाची ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात आणि ओळखपत्र देण्याबाबतच्या समितीची बैठक सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. बैठकीमध्ये ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक आणि त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक बाबींवर समग्र चर्चा झाली. ही बैठक रात्री नऊ वाजता संपली. जिल्हाधिकाऱ्यांनी, मी काही दिवस रजेवर जाणार असल्याने या बैठकीचे इतिवृत्त, आवश्यक तो पत्रव्यवहार, अर्जाचे नमुने आणि तत्सम् दस्तऐवज आत्ताच तयार करा, अशा सूचना केल्या. सामाजिक न्याय विभागाचे साहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी निरीक्षक नाईक, सुभाष पवार यांचे सहकार्य घेतले आणि रात्री २ वाजता कागदपत्रे तयार झाली. लोंढे यांनी रात्री दोन वाजता कुठे येऊ, अशी व्हॉटस‌्ॲपवरून विचारणा केली. रेखावार यांनी त्यांना रात्री दोन वाजताच जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले. कागदपत्रे पाहिली, किरकोळ दुरुस्त्या केल्या आणि पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी त्यांनी सह्या केल्या.

दौलत देसाई यांच्या जागी आलेल्या रेखावार यांनी १३ जुलैला कार्यभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच जिल्ह्यात महापूर आला. जिल्हाधिकारी कार्यालयच जिल्हा परिषदेत हलवावे लागले. याचदरम्यान त्यांनी रात्री दोन वाजता उजळाईवाडी विमानतळावर धाव घेऊन तेथील पाहणी केली होती. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबण्यास सुरुवात केली आहे. देसाई हे रजेवर गेल्यानंतर अनेक फायलींवर निर्णय झालेला नव्हता. त्यानंतर तातडीची नाहीत म्हणूनही अनेक प्रकरणांबाबत निर्णय होत नव्हता. परंतु याबाबत तातडीने कार्यवाही आता केली जात आहे. अन्य अधिकारी आणि कर्मचारी यांचाही विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा राबवल्यास हीच यंत्रणा जिल्ह्याचे नाव मोठे करण्यामध्ये निश्चित योगदान देईल, यात शंका नाही.

चौकट

सोबतचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काय?

रेखावार यांची ही कामाची पद्धती गतिमान असली तरी, वरिष्ठ अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, छायाचित्रकार यांचा अपमान करणे यांसारख्या त्यांच्या गोष्टी समर्थनीय नाहीत. आपण जसे काम करतो तसेच इतरांनीही करावे, यासाठीचा अतिरेकी अट्टाहास धरण्याचीही आता वेगळी चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारीच रात्री उशिरापर्यंत थांबत असल्याने साहजिकच संबंधित विषयाचे अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते, ही वस्तुस्थिती आहे.

कोट

माझ्यासारखे रात्री उशिरापर्यंत अन्य अधिकाऱ्यांनी काम करावे, असा मी आग्रह धरलेला नाही. फक्त त्यांनी त्यांचे काम वेळेवर करावे एवढीच माझी अपेक्षा आहे. ज्यावेळी अतिशय गरज असते तेव्हा अधिकाऱ्यांनी बाकी कोणताही विचार न करता कामाला प्राधान्य द्यावे, असा माझा आग्रह राहील. कोणत्याही अधिकाऱ्याचा जाणीवपूर्वक अपमान मी करत नाही.

राहुल रेखावार