शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर न्यूमररी’ पद्धतीने जागा वाढविण्यास मुख्यमंत्री सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:51 IST

कोल्हापूर : सुपर न्यूमररी (अधिसंख्य जागा) पद्धतीने जागा वाढवून वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ...

कोल्हापूर : सुपर न्यूमररी (अधिसंख्य जागा) पद्धतीने जागा वाढवून वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतले जाईल. त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी दिली.

मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक झाली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, मराठा समाजातील अभ्यासक राजेंद्र कोंढरे, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, ॲड. श्रीराम पिंगळे, प्रा. एम. एस. तांबे, आदी उपस्थित होते.

या बैठकीत सकल मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसह सुपर न्यूमररी पद्धतीने जागा वाढविणे आणि विविध पदांवरील नियुक्तींच्या विषयांवर चर्चा झाली. मराठा समाजातील अभ्यासकांनी ‘सुपर न्यूमररी’ जागा वाढविणे कसे योग्य आहे, ते मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले. या पद्धतीने जागा वाढविल्यास अन्य प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर सांगितले. त्यावर सुपर न्यूमररी पद्धतीने जागा वाढविण्यास मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उपस्थित सर्व मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. एसईबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन ‘सुपर न्यूमररी’बाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. गुरुवारी ते दिल्लीतील कायदेशीर सल्लागारांसमवेत चर्चा करणार आहेत. एमपीएससी, महावितरण आदी विविध विभागांमधील समांतर आणि एसईबीसी आरक्षणातील विविध पदांच्या नियुक्त्यांबाबतही चर्चा झाली. त्याबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.

चौकट

‘लोकमत’ने मांडला मुद्दा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा प्रश्न ‘लोकमत’ने ‘एमबीबीएसच्या प्रवेशामध्ये मराठा तरुणांची कोंडी’ या वृत्ताद्वारे दि. २१ नोव्हेंबर रोजी मांडला होता.