कृष्णा-पंचगंगा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले श्री दत्त मंदिर आहे. याठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. मात्र, सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन परिस्थिती असल्यामुळे मंदिरातील सर्व धार्मिक विधी बंद असून मंदिर बंद आहे. त्यामुळे माशांना मिळणारे खाद्यही बंद झाले आहे. नृसिंहवाडीतील काही ग्रामस्थ पापविनाशी तीर्थाजवळ खाद्य टाकून माशांची भूक भागवत असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. त्यामुळे माशांना खाद्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
-
चौकट - दत्त देव संस्थान करणार सुविधा
दत्त देव संस्थानकडून दररोज संध्याकाळी खास माशांसाठी अन्नाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे मासेमारी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी मेघशाम पुजारी व महादेव पुजारी यांनी केली.
फोटो - ०६०५२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - नृसिंहवाडी येथे पुलानजीक मासेमाऱ्यांच्या जाळ्यात सापडलेले ३० ते ३२ किलो वजनाचे मासे. (छाया-प्रशांत कोडणीकर)