शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

उत्तुरात विद्यार्थी देणार ग्रामस्थांना स्वच्छतेचे धडे

By admin | Updated: December 19, 2014 23:35 IST

१५०० विद्यार्थ्यांचा सहभाग : ग्रामपंचायत करणार विद्यार्थ्यांना मदत; प्रभागनिहाय स्वच्छतेचा मंत्र

रवींद्र येसादे - उत्तूर -माझं गाव स्वच्छ अन् सुंदर दिसण्यासाठी उत्तुरातील सर्व शाळा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने १५०० विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रॅली काढून प्रबोधन करण्यात येणार आहे.ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्तूर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. जे. पी. नाईक महाविद्यालय, अरविंद विद्यामंदिर, पार्वती शंकर विद्यालय, कुमार व कन्या विद्यामंदिर, नवजीवन विद्यालय व वसंतरावदादा पाटील येथे शिक्षकांची बैठक घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय झाला. सध्या ‘स्वच्छ भारत-सुंदर भारत’ या संकल्पनेनुसार गाव स्वच्छ असावे, ही संकल्पना विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांसमोर मांडण्यात येऊन कचरा उठावाचे सातत्य ग्रामस्थांनी राखावे. स्वच्छता मोहिमेबाबत सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच संजय उत्तूरकर, ग्रामसेवक राजेंद्र नुल्ले, सदस्य महेश करंबळी यांची बैठक होऊन कचरा उठावाबाबत चर्चा झाली.ग्रामस्थांनी सातत्य राखावेदोन टप्प्यात गाव स्वच्छ ठेवण्याचे शाळांनी ठरवले आहे. कचरा उठाव केल्यानंतर पुन्हा कचरा होऊ नये म्हणून पालक, ग्रामस्थ, व्यापारी, हॉटेल मालक यांनी काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वच्छतेमध्ये ग्रामस्थांनी सातत्य राखावे, अशी मागणीही शाळांनी केली.बांधकाम परवानाबाबत ग्रा.पं.ने काळजी घ्यावीघराच्या पाठीमागे असणारी परडी रिकामी न ठेवता बांधकामे होत आहेत. पूर्वी कचरा परड्यात कुजून तो शेताकडे खत म्हणून वापरला जायचा. ते आता बंद होऊन कचरा रस्त्यावर येऊन उकिरडे तयार होत आहेत. याकडेही ग्रा.पं.ने लक्ष द्यावे.केवळ कर्मचारी म्हणूनच सोसतात...कचरा उठावासाठी असणारे ग्रा.पं.चे कर्मचारी हतबल झाले आहेत. ओल्या, सुक्या कचऱ्याबरोबर चुलीतील राख, जुनी कपडे, प्लास्टिक, शेळ्या-मेंढ्यानी खाल्लेली ओली लाकडे आदी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. केवळ कर्मचारी म्हणूनच हा प्रकार सोसत आहेत. ग्रामस्थांनी किमान कचरा टाकताना विचार करावा.शाळांच्या निर्णयाचे स्वागतस्वच्छता करण्याच्या निर्णयाचे ग्रा.पं.ने सर्व शाळांचे स्वागत केले. स्वच्छतेत सातत्य टिकवण्यासाठी ग्रा.पं.चे सहकार्य असून, स्पर्धा राबवण्याचा निर्णय घेतला असून २६ जानेवारी अथवा १५ आॅगस्टला विद्यार्थ्यांना यथोचितपणे गौरविले जाईल, असे ग्रामपंचायतीने सांगितले.