शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘आयजीएम'ची स्वच्छता रबे अल केअरकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:13 IST

फोटो लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयातील स्वच्छता तसेच आवश्यक मनुष्यबळ मोफत देण्याच्या कामास शुक्रवारी शिवजयंतीचे औचित्य ...

फोटो

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयातील स्वच्छता तसेच आवश्यक मनुष्यबळ मोफत देण्याच्या कामास शुक्रवारी शिवजयंतीचे औचित्य साधत सुरुवात करण्यात आली. सातारा येथील रबे अल केअर या संस्थेने आमदार प्रकाश आवाडे यांच्या विनंतीवरून एक महिना हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येथील आयजीएम रुग्णालयाच्या अस्वच्छतेवरून आमदार आवाडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच स्वच्छतेबाबत तात्काळ निर्णय घ्या; अन्यथा आम्ही जबाबदारी घेतो, असा इशारा दिला होता. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी रबे अल केअर या संस्थेला रुग्णालयातील स्वच्छतेचे काम सोपविले आहे. त्यांच्यामार्फत संपूर्ण रुग्णालय व परिसर स्वच्छता करणे. वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक मदतनीस, नर्स, वॉर्ड बॉय, आया पुरवणे, स्वच्छतेचे साहित्य पुरवणे, आदी कामे केली जाणार आहेत. याची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली. यावेळी आमदार आवाडे, संस्थेचे प्रमुख सुनील सनबे, राहुल आवाडे, प्रकाश दत्तवाडे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी १९०२२०२१-आयसीएच-०४ इचलकरंजीत आयजीएम रुग्णालयातील स्वच्छता एक महिना मोफत करण्याच्या कामाचा शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, सुनील सनबे, राहुल आवाडे, प्रकाश दत्तवाडे आदी उपस्थित होते.