शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या केलेल्या पाच शेतकऱ्यांचे दावे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 13:29 IST

गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पाच शेतकऱ्यांचे सानुग्रह अनुदानाचे दावे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजूर केले. विषप्राशन केलेल्या दोघांचे मात्र दावे फेटाळण्यात आले. या पाचजणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० हजार रुपये रोख व ७० हजार रुपये पोस्टाचे बचत प्रमाणपत्र असे एक लाखाचे अनुदान दिले जाणार आहे.

ठळक मुद्देआत्महत्या केलेल्या पाच शेतकऱ्यांचे दावे मंजूरदोघांचे दावे फेटाळले: प्रत्येकी एक लाखाचे सानुग्रह अनुदान

कोल्हापूर : गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पाच शेतकऱ्यांचे सानुग्रह अनुदानाचे दावे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजूर केले. विषप्राशन केलेल्या दोघांचे मात्र दावे फेटाळण्यात आले. या पाचजणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० हजार रुपये रोख व ७० हजार रुपये पोस्टाचे बचत प्रमाणपत्र असे एक लाखाचे अनुदान दिले जाणार आहे.जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या शेतकरी आत्महत्या समितीची बैठक झाली. बैठकीला समिती सदस्य म्हणून शिवाजीराव परुळेकर, जनरल तहसीलदार अर्चना कापसे, गडहिंग्लज तहसीलदार दिनेश पारगे, करवीर तहसीलदार शीतल मुळे, शिरोळचे तहसीलदार अपर्णा मोरे, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे उपस्थित होते.दावे मंजूर केलेल्या पाचजणांमध्ये गडहिंग्लज व शिरोळ तालुक्यांतील प्रत्येकी दोन शेतकरी आहेत; तर करवीर तालुक्यातील एक आहे. या पाचही जणांचा फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात गळफास घेऊन मृत्यू झाला आहे. यात सुनील बंदी (भडगाव, ता. गडहिंग्लज), पांडुरंग अनकमोरे (कडलगे, ता. गडहिंग्लज), राजाराम भाट (कोगे, ता. करवीर), रावसाहेब माळी (तेरवाड, ता. शिरोळ), राजेंद्र पाटील (शिरोळ) यांचा समावेश आहे.शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद असूनही विषप्राशन आणि उलटसुलट जबाबांमुळे दोन शेतकऱ्यांचे दावे नामंजूर झाले आहेत. यात गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील शेतकरी विष्णू भोसले यांनी ३० मार्च रोजी विष प्राशन केले होते. ते स्वत: कर्जदार नसून त्यांच्या आईच्या नावावर कर्ज असल्याचे सांगत हा दावा फेटाळण्यात आला.

अशीच परिस्थिती करवीर तालुक्यातील वाकरे येथील शेतकरी कृष्णात पाटील यांची झाली. कर्जाच्या ओझ्यामुळे १३ जुलैला त्यांनी विष प्राशन करून जीवन संपविले होते; पण त्यांनी दोन दिवशी दोन वेगवेगळे जबाब दिल्याने त्यांच्याही कुटुंबीयांचा सानुग्रह अनुदानाचा दावा समितीने फेटाळून लावला.

 

एक लाखाची दिली जाणारी सानुग्रह अनुदानाची रक्कम फारच तोकडी असल्याने ती चार लाख रुपये करावी, अशी मागणी मी केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने सरकारला सूचनाही दिल्या होत्या; पण त्यांचे आजअखेर पालन झालेले नसल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक फरफट कायम आहे.- शिवाजीराव परुळेकर, आत्महत्याग्रस्त शेतकरी संघर्ष समिती 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी