शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नगररचना कार्यालयात पैसेवाल्यांचीच कामे होतात, स्थायी समिती सभेत आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 17:44 IST

नगररचना कार्यालयात नागरिकांनी किती फेऱ्या मारायच्या, असा सवाल करत कामकाज सुधारा अन्यथा आम्हालाच नगररचना कार्यालयात येऊन बसावे लागेल, असा गर्भित इशारा गुरुवारी स्थायी समितीने प्रशासनाला दिला. या कार्यालयात केवळ पैसेवाल्यांचीच कामे होतात, असा थेट आरोपही यावेळी करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते.

ठळक मुद्देनगररचना कार्यालयात पैसेवाल्यांचीच कामे होतातस्थायी समिती सभेत आरोप

कोल्हापूर : नगररचना कार्यालयात नागरिकांनी किती फेऱ्या मारायच्या, असा सवाल करत कामकाज सुधारा अन्यथा आम्हालाच नगररचना कार्यालयात येऊन बसावे लागेल, असा गर्भित इशारा गुरुवारी स्थायी समितीने प्रशासनाला दिला. या कार्यालयात केवळ पैसेवाल्यांचीच कामे होतात, असा थेट आरोपही यावेळी करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते.नगररचना कार्यालयाबाबत तक्रारी वाढत आहेत. नागरिकांना नुसत्या फेऱ्या मारायला लावल्या जातात. अधिकारी भेटत नाहीत, भेटले तरी पैसेवाल्यांसाठी काम करतात, असा आरोप सदस्यांनी केला. एक नागरिक सायकलवरून उदबत्ती विकून पोट भरतो. या नागरिकाने दोन खोल्यांचे घर बांधले असून, तो गेले सहा महिने कार्यालयात भोगवटा प्रमाणपत्रासाठी फेऱ्या मारत आहे. त्याला रोज कर्मचाऱ्याकडून आॅफिसवर बसविले जाते. हातावरीचे पोट असणाऱ्या माणसांनी किती फेऱ्या मारायला लावायच्या, अशी विचारणा सभापती देशमुख यांनी केली.जुनी मोरे कॉलनी येथील लेआऊट बाबत वारंवार प्रश्न विचारले असता, पुढील मिटिंगपर्यंत कार्यवाही करतो, अशी उत्तरे दिली जातात. प्रत्येक मिटिंगला वेगवेगळे अधिकारी उपस्थित असतात. कारवाई करा, अन्यथा पुन्हा नगररचना कार्यालयास टाळे घालणार, असा इशारा दीपा मगदूम यांनी दिला. विकास परवानगी प्रकरणी नगररचना विभागाकडून शनिवारी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे, त्यामध्ये प्रलंबित कामांची पूर्तता केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात टिप्पर आल्यानंतर कंटेनरमुक्त करायचे धोरण होते, त्याचे काय झाले, अशी विचारणा करतानाच एका टिप्परने नागरिकांची गैरसोय होत आहे. कंटेनर जागेवर नाहीत. नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात, याकडे पूजा नाईकनवरे यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी झालेल्या चर्चेत माधुरी लाड, प्रतिज्ञा उत्तुरे यांनीही भाग घेतला.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर