शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

ग्राहकहित संरक्षणाबाबत नागरिकांनी जागरूक व्हावे -- सविता भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 1:09 PM

भोसले म्हणाल्या, या कायद्यामध्ये सुचविण्यात आलेल्या सुधारणेनुसार ‘जिल्हा आयोग’ असा शब्दप्रयोग करण्यात येणार असून, एक कोटीपर्यंतच्या तक्रारींची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे. हा बदल नवीन वर्षात लागू होण्याची अपेक्षा आहे.

ठळक मुद्दे ‘जागो ग्राहक जागो’ मोहीम

कोल्हापूर : कोणत्याही पातळीवर ग्राहकांची फसवणूक होऊ नये व त्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी १९८६ साली कायदा झाला. याबाबत ग्राहकांनी जागरूक व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष सविता भोसले यांनी बुधवारी केले.

येथील शाहू स्मारक भवनात ‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेअंतर्गत शासकीय सदस्य आणि अधिकारी यांच्या प्र्रशिक्षणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अरुण यादव उपस्थित होते.

भोसले म्हणाल्या, या कायद्यामध्ये सुचविण्यात आलेल्या सुधारणेनुसार ‘जिल्हा आयोग’ असा शब्दप्रयोग करण्यात येणार असून, एक कोटीपर्यंतच्या तक्रारींची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे. हा बदल नवीन वर्षात लागू होण्याची अपेक्षा आहे.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे ग्राहक आॅनलाईन खरेदीच्या तक्रारीही दाखल करू शकतो. कर्ज प्रकरणातील अटी-शर्ती, विमा कंपन्यांबाबतही आपण जागरूक असायला हवे. शेतकरी हाही ग्राहकच असतो. बी-बियाणे, पाईपलाईन जोडणी प्रकरणात त्याचीही फसवणूक होऊ शकते. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे धाव घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.

जिल्हा तांत्रिक समन्वयक करण गायकवाड यांनी अन्नसुरक्षा कायदा, ई-पॉस मशीन याबाबत अन्न प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, औषध प्रशासनाच्या साहाय्यक आयुक्त मनीषा पाटील, जिल्हा सार्वजनिक आरोग्य शाळेचे अन्नविश्लेषक डॉ. रवींद्र शिंदे यांनी भेसळीबाबत किंवा वस्तूचा दर्जा ठरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळांची माहिती यावर मार्गदर्शन केले; तर उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी कृषिक्षेत्रातील शासनाच्या योजना याविषयी मार्गदर्शन केले. अन्नवितरण अधिकारी माधवी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात बुधवारी ‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेअंतर्गत शासकीय सदस्य आणि अधिकारी यांच्या प्र्रशिक्षणप्रसंगी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष सविता भोसले यांनी मार्गदर्शन केले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर