‘सर्किट बेंच’प्रश्नी खंडपीठ कृती समितीची आज बैठक

By Admin | Updated: August 2, 2015 01:20 IST2015-08-02T01:20:56+5:302015-08-02T01:20:56+5:30

उच्च न्यायालयाने घातलेल्या ‘खो’मुळे हा लढा थांबणार नाही

'Circuit Bench' question today in the Bench Action Committee | ‘सर्किट बेंच’प्रश्नी खंडपीठ कृती समितीची आज बैठक

‘सर्किट बेंच’प्रश्नी खंडपीठ कृती समितीची आज बैठक

कोल्हापूर : ‘सर्किट बेंच’बाबत उच्च न्यायालयाने घातलेल्या ‘खो’मुळे हा लढा थांबणार नाही, तर तो अधिक तीव्र करण्याचा निर्णय जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज, रविवारी जिल्हा बार असोसिएशनच्या सभागृहात दुपारी बारा वाजता खंडपीठ कृती समितीची बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्याच्या मागणीला अभिप्रायाच्या मतदानानंतर ‘खो’ बसला. या पार्श्वभूमीवर बार असोसिएशनची बैठक होती. ज्येष्ठ विधिज्ञांनी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक घ्यावी, अशी सूचना केली. त्यानुसार ही बैठक होत असल्याचे अ‍ॅड. चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Circuit Bench' question today in the Bench Action Committee