अंबाबाई मंदिरातील अतिक्रमणांवर सर्किट बेंचमध्ये १ एप्रिलला सुनावणी; देवस्थान, जिल्हा प्रशासन, दुकानदारांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 19:59 IST2026-03-12T19:59:20+5:302026-03-12T19:59:43+5:30

सुरक्षितता व मंदिर रचनेच्या दृष्टीनेदेखील ते योग्य नसल्याने ही दुकाने हटविण्यात यावीत, अशी मागणी प्रमोद सावंत यांच्यासह काही जणांनी केली होती.

Circuit bench hearing on encroachments in Ambabai temple; Notice to temple, district administration, shopkeepers | अंबाबाई मंदिरातील अतिक्रमणांवर सर्किट बेंचमध्ये १ एप्रिलला सुनावणी; देवस्थान, जिल्हा प्रशासन, दुकानदारांना नोटीस

अंबाबाई मंदिरातील अतिक्रमणांवर सर्किट बेंचमध्ये १ एप्रिलला सुनावणी; देवस्थान, जिल्हा प्रशासन, दुकानदारांना नोटीस

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील अतिक्रमणांबाबत बुधवारी सर्किट बेंच येथे सुनावणी सुरू झाली आहे. या पहिल्या सुनावणीला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हा प्रशासन व दुकानदारांपैकी कुणीही उपस्थित न राहिल्याने कामकाज होऊ शकले नाही. त्यांना नोटीस काढून १ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायमूर्तींनी दिले आहे.

श्री अंबाबाई मंदिराच्या ओवऱ्यांमध्ये २५ हून अधिक दुकाने, देवस्थान समितीचे कार्यालय आहेत. पूर्वी देवस्थान समितीने त्या व्यवसायासाठी दिल्या. मात्र यामुळे आवारात भाविकांना बसण्यासाठी जागा नाही. सुरक्षितता व मंदिर रचनेच्या दृष्टीनेदेखील ते योग्य नसल्याने ही दुकाने हटविण्यात यावीत, अशी मागणी प्रमोद सावंत यांच्यासह काही जणांनी केली होती.

याची सुनावणी होऊन तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, असा निकाल दिला होता. त्यावर दुकानदारांनी उच्च न्यायालयात दाद मागून या निर्णयावर स्थगिती आणली होती. त्यावेळी न्यायालयाने या विषयावर पर्याय देता येतो का, अशी विचारणा केली होती. 

मात्र, गेल्या सात-आठ वर्षात हे प्रकरण न्यायालयात चालले नाही. प्रमोद सावंत यांनी मात्र पुन्हा या विषयावर सर्किट बेंचकडे दाद मागितली. हा दावा दुकानदार विरुद्ध देवस्थान समिती, जिल्हा प्रशासन असा आहे. तर, प्रमोद सावंत हे त्यामध्ये सुमोटो सहभागी झाले आहेत. त्याची पहिली सुनावणी बुधवारी होती.

मात्र, संबंधित वादी-प्रतिवादींपैकी कुणी हजर न झाल्याने सुनावणी होऊ शकली नाही. त्यावर सर्किट बेंचने पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी ठेवली असून, संबंधितांना नोटीस काढून त्यावेळी उपस्थित राहायला सांगितले आहे. प्रमोद सावंत यांच्या वतीने ॲड. नरेंद्र गांधी हे कामकाज पाहत आहेत.

Web Title : अंबाबाई मंदिर अतिक्रमण पर सुनवाई; अधिकारियों, दुकानदारों को नोटिस जारी।

Web Summary : अंबाबाई मंदिर अतिक्रमण सुनवाई संबंधित पक्षों की अनुपस्थिति के कारण स्थगित। मंदिर ट्रस्ट, जिला प्रशासन और दुकानदारों को शामिल करते हुए 1 अप्रैल की सुनवाई के लिए नोटिस जारी। मंदिर परिसर में दुकानों से जुड़ा विवाद।

Web Title : Hearing on Ambabai Temple encroachments; Notices to authorities, shopkeepers issued.

Web Summary : Ambabai temple encroachment hearing adjourned due to absence of concerned parties. Notices issued for April 1st hearing involving temple trust, district administration, and shopkeepers. Dispute involves shops within temple premises.