शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनी अनुभवली माणुसकीची ऊब

By admin | Updated: December 2, 2014 00:46 IST

उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद : थंडीत कुडकुडणाऱ्या जिवांना कपडे वाटप सुरू --लोकमतइनिशिएटिव्ह

कोल्हापूर/कसबा बावडा : रंगीबेरंगी शर्ट, टी-शर्ट, जॅकेट,जीन्स् पॅण्ट अशी स्वच्छ, इस्त्री केलेली तसेच नवीन कपडे मिळाल्याने ऊसतोड मजुरांच्या पालावरील चिमुकले आज, सोमवारी हरखून गेली. कोल्हापूरकरांनी कपड्यांच्या माध्यमातून दिलेल्या माणुसकीच्या ऊबेने ‘त्या’ चिमुकल्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद ओसांडून वाहत होता. ‘लोकमत इनिशिएटिव्ह’अंतर्गत संकलित झालेल्या कपड्यांच्या वाटप मोहिमेला प्रारंभ झाला.शहरातील झोपडपट्टी तसेच ऊसतोड मजुरांच्या वसाहतींमधील थंडीत कुडकुडणाऱ्या चिमुकल्यांची व्यथा ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून ‘लोकमत’ने मांडली. कपड्यांच्या माध्यमातून त्यांना माणुसकीची ऊब देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर मदतीसाठी कोल्हापूरकर सरसावले. ‘अवनि’ संस्थेने या उपक्रमात सहभागी होऊन कपडे संकलनाची मोहीम राबविली. १९ दिवसांच्या मोहिमेला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शहरासह विविध भागांतील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी शाळा, सामाजिक, कामगार, शैक्षणिक संस्थांनी ‘एकटी’च्या कार्यालयात कपडे जमा केले. सुमारे दोन ते अडीच हजार मुलांना देता येतील इतके कपडे संकलित झाले आहेत. संकलित झालेल्या कपड्यांच्या वाटपाला आज, दुपारी दीड वाजता राजाराम साखर कारखाना परिसरातील ऊसतोडणी मजुरांच्या वसाहतीपासून सुरुवात केली. कळकट-मळकट कपड्यात वावरणाऱ्या मुलांना रंगीबेरंगी टी-शर्ट, जॅकेट, पॅण्ट, तर मुलींना शालेय गणवेश, चुडिदार, फ्रॉक, आदी कपडे देण्यात आली. स्वच्छ, इस्त्री केलेली तसेच नवीन कपडे मिळाल्यानंतर लगेचच परिधान करून ही मुले एकमेकांना ती कौतुकाने दाखवत होते. माणुसकीच्या ऊबेने ती हरखून गेली. कपड्यांच्या नवलाईचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आनंदाच्या भरात या मुलांनी कविता, बडबडगीते म्हणून दाखविली. याठिकाणी ‘अवनि’च्या उपाध्यक्ष अनुराधा भोसले, साताप्पा मोहिते, अतुल मुगडे, अर्चना मांगलेकर यांच्या हस्ते कपड्यांचे वाटप करण्यात आले.नवलाईचा आनंद... थंडीत कुडकुडणाऱ्या जिवांना कपड्यांच्या माध्यमातून माणुसकीची ऊब देण्याचे आवाहन ‘लोकमत इनिशिएटिव्ह’द्वारे करण्यात आले. त्याला कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. सोमवारी कसबा बावडा (ता. करवीर) येथील राजाराम कारखाना परिसरातील ऊसतोड मजुरांच्या पालावरील चिमुकल्यांपासून कपडे वाटपाला सुरुवात झाली. कपडे मिळाल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर नवलाईचा आनंद फुलला होता.