शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Kolhapur Crime: आदमापुरातून अपहरण झालेल्या मुलाची ४८ तासात सुखरूप सुटका, दाम्पत्याला अटक

By उद्धव गोडसे | Updated: March 7, 2023 14:06 IST

तपास पथकास २५ हजार रुपयांचे बक्षिस

कोल्हापूर : आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिर परिसरातून दाम्पत्याने अपहरण केलेल्या सहा वर्षीय मुलाचा ४८ तासात शोध घेऊन पोलिसांनी सुटका केली. मुलाचे अपहरण करणारे मोहन आंबादास शितोळे (वय ५०) आणि छाया मोहन शितोळे (वय ३०, दोघे रा. जवळा, ता. सांगोला, जि. सोलापूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली.

मूल होत नसल्याच्या कारणातून दाम्पत्याने सहा वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज, मंगळवारी (दि. ७) पत्रकार परिषदेत सांगितले.अधिक माहिती अशी की, सुषमा राहुल नाईकनवरे (रा. शिवाजीनगर, ता. खंडाळा, जि. सातारा) या त्यांच्या सहा वर्षीय मुलासह शुक्रवारी (दि. ३) आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. देवदर्शनानंतर त्या मुलासह भक्तनिवासमध्ये थांबल्या होत्या. शनिवारी (दि. ४) सकाळी साडेआठच्या सुमारास त्या आंघोळीला गेल्या असता, एक दाम्पत्य त्यांच्या मुलाला घेऊन गेले.

मुलाचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच नाईकनवरे यांनी भुदरगड पोलिसात तक्रार दिली. पौर्णिमेपूर्वी तीर्थक्षेत्रावरून घडलेल्या बालकाच्या अपहरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा गतिमान केली. आदमापूर येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा माग काढण्यात आला.संशयित दाम्पत्य मुलाला घेऊन निपाणी, चिक्कोडी, अंकली, मायाक्का चिंचणी मार्गे मिरजकडे गेल्याचे तपासात लक्षात आले. त्यावरून पोलिस सोलापूर जिल्ह्यातील जावळा येथील मोहन शितोळे या संशयिताच्या घरी पोहोचले. मुलाची सुखरूप सुटका करून पोलिसांनी शितोळे दाम्पत्याला अटक केली. स्वत:ला मूल होत नसल्यानेच मंदिराच्या भक्त निवासातून मुलाला सोबत आणल्याची कबुली संशयित शितोळे दाम्पत्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपास पथकास २५ हजार रुपयांचे बक्षिस

अवघ्या ४८ तासात गुन्ह्याची उकल केल्याबद्दल अधीक्षक बलकवडे यांनी तपास पथकास २५ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले. पत्रकार परिषदेस अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, पोलिस उपअधीक्षक राजीव नवले, एलसीबीचे निरीक्षक महादेव वाघमोडे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस