दागिने पॉलिशच्या बहाण्याने फसवणूक

By Admin | Updated: September 13, 2014 00:34 IST2014-09-13T00:26:29+5:302014-09-13T00:34:47+5:30

कोल्हापूर : दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण व सोन्याच्या बांगड्या,

Cheat jewelry ornaments polish | दागिने पॉलिशच्या बहाण्याने फसवणूक

दागिने पॉलिशच्या बहाण्याने फसवणूक

कोल्हापूर : दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण व सोन्याच्या बांगड्या, असा सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार आज, शुक्रवारी जरगनगर येथील बालाजी पार्क येथे घडला. याबाबतची फिर्याद सरिता अरुण पाटील (वय ३०) यांनी दिली.
सरिता पाटील यांच्या घरी आज सकाळी अनोळखी व्यक्ती आला. त्याने सोन्याचे दागिने व पितळीची भांडी पॉलिश करून देतो, असे सांगितले. पहिल्यांदा पितळीची भांडी पॉलिश केली. त्यानंतर सोन्याचे गंठण व दोन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या पॉलिश करण्यासाठी कुकरमध्ये टाकल्याचा बहाणा केला. काही वेळाने सरिता पाटील यांनी कुकर उघडा केला असता त्यामध्ये दागिने नसल्याचे निदर्शनास आले.

 

Web Title: Cheat jewelry ornaments polish