शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

आजरा तालुक्याच्या राजकारणात बदलाचे वारे

By admin | Updated: May 13, 2015 21:26 IST

पक्षनिष्ठांना तिलांजली : सोयीनुसार आघाड्यांमुळे मुरब्बी बॅकफूटवर, तर नवखे येताहेत पुढे

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -आजरा तालुक्याच्या राजकारणात सद्य:स्थितीत बदलाचे वारे वाहू लागल्याने अनेकांनी आपल्या पक्षनिष्ठांना तिलांजली देऊन सोयीचे व आघाड्यांचे राजकारण सुरू केल्याने भविष्यात पक्षाचे काहीही होवो, पण आपले राजकीय भवितव्य उज्ज्वल कसे होईल? याला प्राधान्य देण्यास सुरूवात केल्याने अनपेक्षितरीत्या राजकीय पार्श्वभूमी नसलेली मंडळी पुढे येत आहेत, तर भलीभली मुरब्बी मंडळी बॅकफूटवर जात आहेत.आजरा साखर कारखाना, आजरा ग्रामपंचायत, जि. प., पं. स. निवडणुकांपासून तालुक्याच्या राजकारणात हा प्रवाह स्थिरावू लागला आहे. कारखाना राजकारणात तत्कालीन अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या विरोधात सर्व मंडळी एकवटली अर्थात एकत्र येणारी मंडळी एकमेकांवरील पे्रमापोटी नव्हे, तर सत्तेसाठी एकत्र आली. सत्तांतर झाले. सत्तांतरानंतर या एकत्र आलेल्या मंडळींमधील वाद चव्हाट्यावर आले. वाद हा प्रकार निवडणुकीनंतर आला. पण, तत्पूर्वी आयुष्यात कारखान्यात संचालक, पदाधिकारी होईन, असे स्वप्नातही न वाटणारी मंडळी संचालकपदावर बसली. पाठोपाठ झालेल्या जि.प. व पं.स. निवडणुकांत कारखान्यातील सत्ताधारी मंडळींनी शह-काटशहाचे राजकारण केले. विधानसभा निवडणुकांमध्ये तर अंतर्गत वाद विकोपाला गेले. आमदार मंडळी विशिष्ट मंडळींचेच ऐकतात असा आरोप करीत आमदारांनाच घरी बसविण्यात आले.कुणाचा पक्ष कुठला, गट कुठला याचा काहीच ताळमेळ नसल्याने राजकीय पटलावर सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. तालुक्यात देसाई मंडळींचे राजकारणावर वर्चस्व होते. मात्र, जिल्हा बँक निवडणुकीत या मंडळींनीही सोयीच्या भूमिका घेतल्या. त्यामुळे तालुका संघाच्या निवडणुकांमध्ये चुरस दिसणार आहे.तालुक्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळत आहे. स्थानिक कार्यकर्ते नेतेमंडळींच्या हातात राहिलेली नाहीत. नवजीवन उदयास येणाऱ्या कार्यकर्त्यांचे वरिष्ठ नेतेमंडळींशी काहीही देणेघेणे नाही. आमचे आम्ही बघू ही भूमिका दोन आमदारांसह के.पी. पाटील यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळेच तालुका खरेदी-विक्री संघासह आजरा साखर कारखाना, २ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नेत्यांच्या हातात राहिलेल्या नाहीत हे निश्चित.गोंधळ निर्माण करणाऱ्या भूमिकाजिल्हा बँकेत नेतेमंडळींच्या भूमिकाही गोंधळ निर्माण करणाऱ्या ठरल्या. पक्षाची अधिकृत उमेदवारी कोणाला द्यायची ? या प्रश्नाचे उत्तर शेवटपर्यंत सापडू न शकल्याने जयवंतराव शिंपी व अशोक चराटी यांच्यात लढत झाली खरी, परंतु दोघेही पक्षप्रमुखांकडून दुखावले गेले आहेत, ते नाकारता येत नाही.