शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

‘घर तिथे शौचालय’ पालिकेपुढे आव्हान

By admin | Updated: March 5, 2016 00:11 IST

जयसिंगपूर पालिका : नगरसेवकांबरोबर प्रशासनाचा सहभाग महत्त्वाचा

संदीप बावचे -- जयसिंगपूर -हागणदारीमुक्तअभियानानंतर आता ‘घर तिथे शौचालय’ उभारण्याचा संकल्प जयसिंगपूर पालिकेने केला आहे़ नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी ५० लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे़ मात्र, घर तिथे शौचालय हे अभियान यशस्वी करण्यासाठी नगरसेवकांबरोबर पालिका प्रशासनाचा सहभाग तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे़ यासाठी जनजागृतीदेखील महत्त्वाची असून, तरच ‘निर्मलशहर’ हे अभियान यशस्वी ठरणार आहे़ सांस्कृतिक चळवळ व शिक्षणाची पंढरी म्हणून शहराची ओळख आहे़ केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धरतीवर हागणदारी मुक्तशहर हा संकल्प पालिकेने हाती घेऊन तो पूर्ण केला आहे़ यासाठी गूड मॉर्निंग पथक, विविध पक्ष, सामाजिक संघटना व पालिका प्रशासनाचे सहकार्य मिळाले़ शौचालय बांधणाऱ्यांना शासनाचे १२ हजार व पालिकेकडून ५ हजार असे एकूण १७ हजारांचे अनुदान देऊन पहिल्या टप्प्यात ३३९ कुटुंबांना शौचालयाची सुविधा पुरविली आहे़ हागणदारीमुक्त शहर म्हणून शासनाकडून पालिकेचा गौरवही झाला. शासनाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी पालिकेला मिळणार आहे़ पहिला टप्प्यात तीस टक्के निधी मिळणार असून, उर्वरित निधी अंतिम सर्वेक्षणानंतर मिळणार असल्याने स्वच्छ भारत अभियान यशस्वी ठेवण्यासाठी पालिकेची जबाबदारी वाढली आहे़शताब्दी वर्ष : ग्रीन सिटी बनविण्याचे ध्येयनिर्मल शहरासाठी पालिकेने हाती घेतलेली संकल्पना येणाऱ्या वर्षभरात निश्चितच पूर्णत्वाला येईल, अशी अपेक्षा आहे़ याचबरोबर शहराला ग्रीन सिटी बनविण्याचे ध्येय असून, शहराचे यंदाचे शताब्दी वर्ष आहे़ यामुळे निश्चितच विकासात्मक कामे पूर्ण होतील, असा विश्वास पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला़हागणदारीमुक्त अभियानानंतर पालिकेने आता ‘घर तिथे शौचालय’ उभारण्याचा संकल्प केला आहे़ २५ जानेवारीला झालेल्या विशेष सभेत घर तिथे शौचालय उभारण्याचा संकल्प नगरसेवकांबरोबर पालिका प्रशासनाने हाती घेतला आहे़ अजूनही शौचालय नसणाऱ्या कुटुंबांना अनुदानाची तरतूद करून देण्यासाठी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ निर्मल शहरासाठी पालिकेने घेतलेल्या निर्णयाचे शहरवासीयांतून स्वागत होत आहे़ हे अभियान यशस्वी करण्यासाठी खरी गरज आहे ती जनजागृतीची. यासाठी प्रभागवार नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे़ शिवाय नगरसेवकांबरोबर पालिका प्रशासनाची सहकार्याची भूमिकाही शहराला दिशा देणार आहे़