स्मशानभूमीतील सोलर लॅम्प गायब...

By Admin | Updated: December 17, 2014 23:12 IST2014-12-17T20:36:39+5:302014-12-17T23:12:03+5:30

दारुड्यांनी दारूसाठी प्रताप केल्याची चर्चा

Cemetery solar lamps missing ... | स्मशानभूमीतील सोलर लॅम्प गायब...

स्मशानभूमीतील सोलर लॅम्प गायब...

आजरा : येथील शिवाजीनगर घाटाशेजारील स्मशानभूमीत लावलेला सुमारे २२ हजार रुपये किमतीचा सोलर लॅम्प स्टँडसह चोरट्यांनी गायब केला असून, काही मद्यपींनी दारूसाठी हा प्रकार केल्याची चर्चा आहे. चर्चा काहीही असली तरी या परिसरात रात्रीच्या वेळी पुन्हा एकदा अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीमार्फत लक्ष्मण बुवा मोरजकर महाराज समाधी परिसर व स्मशानभूमी येथे प्रकाशाची व्यवस्था व्हावी म्हणून सोलर लॅम्प बसविण्यात आले होते. रात्रीच्यावेळी
दहनविधीकरिता होणारी अडचण या लॅम्पमुळे दूर झाली होती.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून स्टँडसह संपूर्ण युनिटच येथून गायब झाले आहे. बॅटरीवर असणारे प्लास्टिकचे आच्छादन केवळ स्मशानशेडमध्ये पडून आहे.
आजरा ग्रामपंचायतीनेही याची फारशी गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही. या भागातील
काही मद्यपींनी हा लॅम्प पळवून नेल्याची या भागात चर्चा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cemetery solar lamps missing ...