शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

गैरव्यवहारप्रकरणी वन अधिकाºयांसह तिघांची वेतन वाढ कायमस्वरुपी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:27 AM

बाजारभोगाव : पडसाळी व गोठणे (ता. पन्हाळा) येथे वन व्यवस्थापन समितींतर्गत बांधलेल्या सामाजिक सभागृह कामाच्या गैरव्यवहार प्रकरणी मानवाड (ता. पन्हाळा) येथील तत्कालीन परिमंडल वन अधिकारी व दोन वनरक्षक अशा तिघांची वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्यासह ४२ हजार १४६ रुपयांच्या तफावतीची रक्कम वसूलीचे घेण्याचे आदेश उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला यांनी दिले आहेत.याबाबतचे लेखी ...

ठळक मुद्देआपलं सरकार ' पोर्टलवरील तक्रारीची दोन वर्षांनी दखल

बाजारभोगाव : पडसाळी व गोठणे (ता. पन्हाळा) येथे वन व्यवस्थापन समितींतर्गत बांधलेल्या सामाजिक सभागृह कामाच्या गैरव्यवहार प्रकरणी मानवाड (ता. पन्हाळा) येथील तत्कालीन परिमंडल वन अधिकारी व दोन वनरक्षक अशा तिघांची वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्यासह ४२ हजार १४६ रुपयांच्या तफावतीची रक्कम वसूलीचे घेण्याचे आदेश उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला यांनी दिले आहेत.

याबाबतचे लेखी आदेश तक्रारदार रामचंद्र बाबू करले ( रा. पिसात्री , ता. पन्हाळा) यांना प्राप्त झाले आहेत. कारवाई झालेल्यांत मानवाडचे तत्कालीन परिमंडल वन अधिकारी विनायक कदम , वनरक्षक पी. बी. कोळी व सौ. सं . अ. बोभाटे यांचा समावेश आहे.याबाबत अधिक माहिती अशी, पडसाळी व गोठणे येथे संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत सामाजिक सभागृह बांधकाम झाले होते. 'आपलं सरकार ' या शासनाच्या वेब पोर्टलवर २८ आॅक्टोबर २०१५ रोजी सदरचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार श्री. करले यांनी नोंदवली होती. त्याबाबत विभागीय वनाधिकारी श्री. भोसले व उपवन अभियंता यांनी पाहणी करुन सादर केलेल्या सविस्तर अहवालात कामात अनेक गंभीर त्रूटी आढळल्याचे नमूद केले होते.

पडसाळी व गोठणे येथे संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत बांधलेल्या सामाजिक सभागृहासाठी तीन नव्या भिंती बांधून शेजारच्या इमारतीची एक जुनी भिंत वापरुन खर्च वाचवला आहे. अंदाजपत्रकाकडे डोळेझाक करुन मनमानी करत सागाच्या चौकट- दरवाज्याऐवजी सिंमेंटची चौकट व पत्र्याचा दरवाजा बसवला आहे. स्टीलऐवजी सिंमेटची खिडकी वापरली आहे. गिलाव्यासह रंगकामही निकृष्ट केले आहे. छतासाठी गॅल्वनाईज पत्र्याऐवजी अ‍ॅसबेस्टॉस सिंमेटचा पत्रा वापरला आहे. प्रत्यक्ष नियोजन व अंदाजपत्रकाप्रमाणे काम न झाल्याने मोजमाप पुस्तकातील खोल्यांचे व प्रत्यक्ष इमारतीचे आकारमान यात खूप तफावत आहे.

झालेल्या कामांच्या बाबवार मोजमापांची वस्तुस्थितीदर्शक नोंद नाही. अंदाजपत्रकातील गोषवाºयाप्रमाणे बिले आदा केली आहेत. कामाचे मूल्यांकन व खर्च रक्कम यात पडसाळी व गोठणेच्या कामात रक्कम ४२ हजार १४६ रूपयांची विसंगती आहे. मोजमाप पुस्तिकेवर सहाय्यक वन संरक्षक व उपवनसंरक्षक यांनी तपासणीचा शेरा दिलेला नाही.याया प्रकरणाची रीतसर चौकशी होवूनही तत्कालीन उपवनसंरक्षक रंगनाथा नाईकड़े यांच्या दुर्लक्षामुळे याबाबत दोन वर्षे कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. तथापि, तक्रारदार श्री. करले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभुनाथ शुक्ल यांनी दोषी कर्मचाºयांवर प्रत्येकी एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्याची कारवाई केली.

तफावत आढळलेल्या ४२ हजार १४६ रुपयांपैकी वनपाल विनायक कदम यांचेकडून ३१ हजार ६१० रुपए तर वनरक्षक पी. बी. कोळींकडून ६ हजार ८१२ रुपए तत्काळ वसुलीचे आदेश श्री. शुक्ला यांनी दिले आहेत. वनरक्षक सौ.सं. अ. बोभाटे यांनी ३ हजार ७२४ रुपए जमा केले आहेत. दरम्यान , तक्रारदार श्री.करले यांनी दोषी अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांना दिले आहे.