इचलकरंजीत अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड, माजी आमदार हाळवणकरांच्या मुलाचीही कार फोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 12:00 IST2023-07-17T11:54:51+5:302023-07-17T12:00:44+5:30
इचलकरंजी : येथील जवाहरनगर लिगाडे मळ्यातील रस्त्यावर लावलेल्या सुमारे आठ ते दहा चार चाकी गाड्या रविवारी मध्यरात्री अज्ञाताने फोडल्या. ...

इचलकरंजीत अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड, माजी आमदार हाळवणकरांच्या मुलाचीही कार फोडली
इचलकरंजी : येथील जवाहरनगर लिगाडे मळ्यातील रस्त्यावर लावलेल्या सुमारे आठ ते दहा चार चाकी गाड्या रविवारी मध्यरात्री अज्ञाताने फोडल्या. शुद्ध पेय जल प्रकल्पावर ही दगडफेक केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
लिगाडे मळ्यातील महानगरपालिकेच्या शाळेच्या आवारात लावलेल्या तसेच लिगाडे यांच्या घरासमोरील दरात लावलेल्या आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या घरासमोरील रस्त्यावर लावलेल्या सुमारे आठ ते दहा चार चाकी गाड्या अज्ञात व्यक्तीने रात्री एकच्या सुमारास फोडल्या. यात गाडी मालकांचे मोठे नुकसान झाले.
महापालिकेच्या मराठी शाळेजवळ असलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे शुद्ध पेयजल प्रकल्पाच्या काचाही फोडल्या. त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या परिसरात सीसीटीव्ही गेल्या अनेक दिवसापासून बंद आहेत. सीसीटीव्ही दुरुस्त करण्याची मागणी वारंवार नागरिकांतून करण्यात येत होती. मात्र ती दुरुस्त न केल्याने हल्लेखोरांनी त्याचा गैरफायदा घेतल्याची चर्चा आहे.