शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: २५ लाख लूटप्रकरणी बोगस तपासणी अधिकाऱ्यांच्या कारची ओळख पटली, लवकरच उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:18 IST

रकमेबाबत संभ्रम

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गालगत तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ तपासणी अधिकारी असल्याचे सांगून एका व्यावसायिकाची २५ लाख ५० हजारांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. संशयितांच्या निळ्या रंगाच्या कारची ओळख पटवण्यात यश आले आहे. दोन दिवसांत गुन्ह्याचा उलगडा होईल, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. दरम्यान, फिर्यादी सुभाष लक्ष्मण हारणे (वय ५०, रा. बागल चौक, कोल्हापूर) यांच्याकडे गांधीनगर पोलिसांनी बुधवारी सलग सहा तास चौकशी केली.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शासकीय तपासणी नाके आणि पथकांकडून संशयास्पद वाहनांची झडती घेतली जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन बोगस तपासणी पथकाने व्यावसायिक सुभाष हारणे यांना कारवाईची भीती घालून त्यांच्याकडील २५ लाख ५० हजारांची रोकड आणि त्यांचा मोबाइल लंपास केला. मंगळवारी (दि. १२) पहाटे हा प्रकार उघडकीस येताच जिल्ह्यात खळबळ उडाली.पोलिसांनी तातडीने बोगस अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत. कारचा प्रवास कुठून कुठे झाला? रोकड लुटल्यानंतर ती कोणत्या दिशेला गेली? याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. लवकरच संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश येईल, असे आयजी फुलारी यांनी सांगितले.संशयित स्थानिक असावेततपासणी अधिकारी असल्याचे भासवून लूट करणारे संशयित फिर्यादीशी कोल्हापुरी पद्धतीने बोलत होते. त्यांची कार काही वेळ या परिसरात फिरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यावरून ते स्थानिक असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. फिर्यादी हारणे यांच्यावर पाळत ठेवून लूट केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

रकमेबाबत संभ्रमजत्रेत पाळणे लावणाऱ्या व्यावसायिकाकडे एका वेळी २५ लाखांची रक्कम कशी काय असू शकते? ही रक्कम कोणत्या यात्रेतून आणली होती? यात आणखी कोणाचा वाटा आहे काय? याबाबत स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे रक्कम नेमकी किती होती आणि ती कशाची होती? याचा छडा लावण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्यासाठी पोलिसांनी बुधवारी फिर्यादी हरणे यांच्या घराची पाहणी करून त्यांची सहा तास चौकशी केली. चार वर्षांपूर्वी कर्नाटकात त्यांच्याकडील रकमेची लूट झाली होती, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024