Kolhapur: कारला लागली आग, टाकीचा स्फोट; ७ जण बालंबाल बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:52 IST2026-03-23T12:51:50+5:302026-03-23T12:52:06+5:30

आगीचे लोट बाहेर पडत असतानाही, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी धावत जाऊन गाडीचे दरवाजे ओढून काढले

Car catches fire tank explodes in Udgaon Kolhapur, 7 people survive | Kolhapur: कारला लागली आग, टाकीचा स्फोट; ७ जण बालंबाल बचावले

Kolhapur: कारला लागली आग, टाकीचा स्फोट; ७ जण बालंबाल बचावले

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील औद्योगिक वसाहतीच्या बाह्यवळणावर रविवारी दुपारी एक थरारक घटना घडली. नृसिंहवाडीहून सांगलीकडे जाणाऱ्या एका सातआसनी कारला अचानक आग लागली. आगीचे लोट आणि धुराचे लोट हवेत उसळत असतानाच, भाजप नेते सावकार मादनाईक आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सात जण थोडक्यात बचावले. सर्वांना बाहेर काढल्यानंतर काही क्षणांतच कारच्या इंधन टाकीचा मोठा स्फोट झाला.

पुणे येथील पाटील कुटुंबीय नृसिंहवाडी येथे दत्तदर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर कवठेपिरान येथील पाहुण्यांकडे निघाल्या होते. उदगाव येथील ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीच्या बाह्यवळणावर कार आली असता, अचानक इंजिनमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. याच वेळी गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने सर्वांच्या जिवावर बेतले होते.

त्याच वेळी शेताकडे जाणारे भाजप नेते सावकार मादनाईक आणि काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. गाडीतून आगीचे लोट बाहेर पडत असतानाही, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी धावत जाऊन गाडीचे दरवाजे ओढून काढले. चालक, तीन महिला आणि तीन लहान मुलांना तातडीने सुखरूप बाहेर काढले.

सर्व प्रवाशांना सुरक्षित अंतरावर नेल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत कारच्या इंधन टाकीचा भीषण स्फोट झाला. आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. आगदेखील विझविण्यात आली, मात्र अवघ्या १५ मिनिटांत कार जळून खाक झाली होती.

माणुसकीचे दर्शन

या अपघातामुळे पाटील कुटुंब पूर्णपणे हादरून गेले होते. त्यांची अवस्था पाहून मादनाईक यांनी तातडीने स्वतःची चारचाकी गाडी बोलावली आणि या कुटुंबाला कोल्हापूर येथील त्यांच्या घरी सुखरूप पाठवून दिले.

Web Title : कोल्हापुर: कार में लगी आग, टंकी में विस्फोट; सात बाल-बाल बचे

Web Summary : कोल्हापुर के उदगांव के पास एक कार में आग लग गई। स्थानीय नेता और नागरिकों की तत्परता से सात लोग ईंधन टैंक में विस्फोट से ठीक पहले बच गए। घटना के बाद सभी यात्रियों को सुरक्षित घर पहुंचाया गया।

Web Title : Kolhapur: Car Catches Fire, Tank Explodes; Seven Survive Miraculously

Web Summary : A car caught fire near Udgaon, Kolhapur. Prompt action by a local leader and citizens saved seven occupants moments before the fuel tank exploded. All passengers were safely transported home after the incident.