शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, कोल्हापुरातील स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:10 IST

पाच जणांची टोळी

कोल्हापूर : व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने लगट वाढवून अनैतिक संबंधाचा आरोप करण्याची भीती घालत महिलेसह पाच जणांच्या टोळीने तारदाळ येथील व्यावसायिकाकडे ३ कोटींची खंडणी मागितली. याप्रकरणी स्नेहा संजय नारकर (वय ३५, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) हिच्यासह पाच जणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्यावसायिक आनंद श्रीनिवास मर्दा (वय ४७, रा. संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) यांनी सोमवारी (दि. २) रात्री उशिरा फिर्याद दिली.नारकर हिच्यासह शांताबाई वाळकुंडे (रा. यशवंतनगर, इचलकरंजी), संतोष पाटील (रा. चिपरी, ता. शिरोळ), शेखर गाडेकर (रा. जयसिंगपूर) आणि रामचंद्र (नारकर हिच्या कारवरील चालक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. शहापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मर्दा यांची तारदाळ येथे सायझर्स कंपनी आहे. स्नेहा नारकर हिने प्रवासात ओळख वाढवून आपण कोल्हापुरातील एका बँकेत क्रेडिट मॅनेजर पदावर काम करीत असल्याचे सांगितले.व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासह बँकांकडे तारण असलेले सोने लिलावात कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिने संपर्क वाढवला. त्यानंतर काही दिवसांत तिने मर्दा यांच्याकडे ३ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.पैसे न दिल्यास दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून त्रास देण्याची धमकी तिने दिली. हा प्रकार १२ ते २५ मे २०२५ या काळात घडला. नारकर हिला दुसऱ्या गुन्ह्यात लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली असून, तिचा ताबा घेतला जाईल, तसेच इतर आरोपींचाही शोध सुरू असल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली.पाच जणांची टोळीया गुन्ह्यात नारकर हिच्यासह पाच जणांचा सहभाग आहे. त्यांना अटक करून गुन्ह्यातील सहभाग तपासला जाणार आहे. या टोळीने आणखी काही जणांना गंडा घातल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी फिर्याद द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नारकर हिच्यावर दुसरा गुन्हाजयसिंगपूर येथील नितीन जंगम यांना दीड कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४३ लाख ७४ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी नारकर हिच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात तिला अटक झाली आहे. तिच्यावर राज्यात इतर ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस