Kolhapur: शॉर्ट सर्किटमुळे जुळेवाडी खिंडीत बस जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 18:13 IST2023-10-12T18:12:17+5:302023-10-12T18:13:19+5:30

शाहूवाडी : कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील जुळेवाडी खिंडीत शॉर्ट सर्किटमुळे बस जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे पन्नास लाख ...

Bus caught fire due to short circuit on Kolhapur-Ratnagiri highway | Kolhapur: शॉर्ट सर्किटमुळे जुळेवाडी खिंडीत बस जळून खाक

Kolhapur: शॉर्ट सर्किटमुळे जुळेवाडी खिंडीत बस जळून खाक

शाहूवाडी : कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील जुळेवाडी खिंडीत शॉर्ट सर्किटमुळे बस जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे पन्नास लाख रुपयाचे नुकसान झाल्याची वर्दी भिकाजी सदाशिव पाटील (वय 32, रा. सांगाव ता . कागल ) यांनी शाहूवाडी पोलीसात दिली. ही घटना आज, गुरुवारी पहाटे घडली.

भिकाजी पाटील हे (एम एच १० सी आर १२३४)  ही बस घेऊन  गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी जात होते. कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील जुळेवाडी खिंडीच्या वळणावर पहाटेच्या सुमारास अचानक चालकाच्या पाठीमागे शॉर्ट सर्किट होऊन बसला आग लागली. 

चालकाला आग लागल्याचे समजताच प्रवाशांना बाहेर काढून शाहुवाडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मलकापूर नगरपलिकेचा अग्निशामक बंबाला पाचारण करून आग आटोक्यात आणली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ५० ते ५५ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात उल्लेख केला.

Web Title: Bus caught fire due to short circuit on Kolhapur-Ratnagiri highway