पोलिसाच्या घरातच चोराचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST2021-09-22T04:28:10+5:302021-09-22T04:28:10+5:30

कोल्हापूर : बनावट चावीने कुलूप काढून अज्ञात चोरट्याने सुमारे ३१ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. चक्क पोलीस मुख्यालयातील ...

A burglary in the house of the police | पोलिसाच्या घरातच चोराचा डल्ला

पोलिसाच्या घरातच चोराचा डल्ला

कोल्हापूर : बनावट चावीने कुलूप काढून अज्ञात चोरट्याने सुमारे ३१ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. चक्क पोलीस मुख्यालयातील पोलीस लाइनमध्ये घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी प्रशांत चंद्रकांत शेवाळे (वय २६ रा.पोलीस मुख्यालय लाइन नंबर २०, खोली नं. ५) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस मुख्यालयातील लाइनमधील घरात प्रशांत शेवाळे राहात असून, ते शनिवारी रात्री घराला कुलूप लावून ड्युटीवर गेले होते. रविवारी दुपारी १२ वाजता घरी आले असता, त्यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञाताने बनावट चावीने काढून रूममधील सुमारे ३१ हजार ८६४ रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी सोमवारी रात्री उशिरा शाहुपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

Web Title: A burglary in the house of the police