Kolhapur: मानपाडळ्याच्या तलावात बुडून बैलाचा मृत्यू, बेंदूर सणाच्या तोंडावरच शेतकऱ्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:10 IST2025-06-11T13:07:00+5:302025-06-11T13:10:07+5:30

दोन दिवसांपूर्वी खरेदी केली होती बैलजोडी 

Bullock cart falls into water after being thrown by bullock bullock drowns in Manpadle Kolhapur district | Kolhapur: मानपाडळ्याच्या तलावात बुडून बैलाचा मृत्यू, बेंदूर सणाच्या तोंडावरच शेतकऱ्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

Kolhapur: मानपाडळ्याच्या तलावात बुडून बैलाचा मृत्यू, बेंदूर सणाच्या तोंडावरच शेतकऱ्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

दिलीप चरणे

नवे पारगाव : बैल उधळून बैलगाडी तलावात पडल्याने पाण्यात बुडून बैलाचा मृत्यू झाला. सुदैवाने एका बैलाला वाचवण्यात शेतकऱ्याला यश आले. मन पाडळे (ता. हातकणंगले) येथे काल, मंगळवारी (दि.१०) ही घटना  घडली. या घटनेत शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाले. यादुर्घटनेमुळे बेंदूर सणाच्या तोंडावरच जाखले (ता. पन्हाळा) येथील शेतकरी सुरज पंडीत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

जाखले (ता. पन्हाळा) गावचे सुरज पंडीत पाटील हे मनपाडळे येथे त्यांचे पाहुणे दादासो सदाशिव शिंदे-बावडेकर यांच्या शेताची मशागत करण्यासाठी आले होते. ते बैलांना पाणी पाजण्यासाठी तलावाकडे घेऊन जात होते. बैलगाडी उधळून तलावात खोल पाण्यात गेली. बैलगाडी असल्यामुळे त्यांना बाहेर येता आले नाही. पैकी एक बैल वाचवण्यात यश आले. तर दुसऱ्या बैलाचा मृत्यू झाला. 

दोन दिवसांपूर्वी खरेदी केली होती बैलजोडी 

जाखल्याच्या सुरज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी तीन लाखांची बैलजोडी खरेदी केली होती. त्यातील दीड लाखाचा बैल मृत्यू पावल्याने सुरज पाटील हे हतबल झाले. घटनास्थळी तलाठी सतीश नेवरेकर व पशुवैद्यकीय अधिकारी आरती दांडगे व पोलीस पाटील यांनी पंचनामा केला.

Web Title: Bullock cart falls into water after being thrown by bullock bullock drowns in Manpadle Kolhapur district