शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: वीस गुंठे जमिनीसाठी भावासह बापाचा निर्घृण खून; कुऱ्हाड, खोऱ्याने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 11:56 IST

आरोपी पोलिसांत हजर, हाणामारीत मुलगाही गंभीर जखमी

हातकणंगले (जि. कोल्हापूर) : वीस गुंठे जमिनीच्या वादातून हिंगणगाव (ता. हातकणंगले) येथे रविवारी सायंकाळी संभाजी मारुती कुंडले (वय ४७) आणि त्यांचा मुलगा विवेक संभाजी कुंडले (२०) या दोघांनी कुऱ्हाड आणि खोऱ्याचे घाव घालून लहान भाऊ शीतल मारुती कुंडले (४०) आणि वडील मारुती बंडू कुंडले (७२) यांचा खून केला. दोघांचे खून करून संभाजी कुंडले हातकणंगले पाेलिस ठाण्यात हजर झाला तर विवेक हाणामारीत गंभीर जखमी झाला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या खुनाचा गुन्हा रात्री उशिरा पोलिस ठाण्यात दाखल झाला.हिंगणगाव येथील मारुती कुंडले यांना संभाजी आणि शीतल अशी दोन मुले आहेत. घराच्या पाठीमागे त्यांची शेती आहे. मारुती कुंडले यांना ३ एकर शेती होती. त्यापैकी थोरला संभाजी याला १ एकर तर लहान शीतलला २ एकर जमीन दिली होती. लहान भावाला २० गुंठे जमीन जादा दिल्याच्या कारणावरून कुंडले कुटुंबामध्ये वारंवार वाद होत होते. दोघा भावांमध्ये शेतीच्या वादावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. रविवारी सायंकाळच्या सुमारास संभाजीचा मुलगा विवेक (२०) आणि आजोबा मारुती यांच्यामध्ये जमिनीवरून वाद झाला. मुलाबरोबर झालेल्या वादाची माहिती संभाजी याला लागताच त्याने संतापाच्या भरात कुऱ्हाडीने वडील आणि लहान भावावर हल्ला केला. भाऊ शीतल यांच्या डोक्यात, तोंडावर वर्मी घाव घातले तर वडील मारुती यांच्या डोक्यात आणि मानेवर घाव बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Land Dispute Leads to Fratricide and Patricide; Two Arrested.

Web Summary : In Kolhapur, a land dispute led to the brutal murder of a father and son. Sambhaji Kundale and his son Vivek killed Sambhaji's brother and father with axes. Sambhaji surrendered, and Vivek was arrested after being injured in the fight.