Kolhapur: बहिणीला परीक्षेला सोडून घरी परताना काळाचा घाला, अपघातात भाऊ ठार; संकेश्वरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 18:16 IST2024-03-19T18:16:34+5:302024-03-19T18:16:54+5:30
संकेश्वर : बहिणीला परीक्षेसाठी कॉलेजमध्ये सोडून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या भावाला टँकरने जोराची धडक दिल्याने दुचाकीचालक आदर्शकुमार संजय गुप्ता (वय ...

Kolhapur: बहिणीला परीक्षेला सोडून घरी परताना काळाचा घाला, अपघातात भाऊ ठार; संकेश्वरमधील घटना
संकेश्वर : बहिणीला परीक्षेसाठी कॉलेजमध्ये सोडून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या भावाला टँकरने जोराची धडक दिल्याने दुचाकीचालक आदर्शकुमार संजय गुप्ता (वय १६, रा. हाैसिंग कॉलनी, संकेश्वर) या तरुणाचा मृत्यू झाला. शहरातील जुना पी. बी. रोड पोस्ट ऑफिसनजीक सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसातून मिळालेली अधिक माहिती, आदर्शकुमार हा यामाहा स्कूटी (केए - २३, ईक्यू ०४१३) वरून बहीण निशा गुप्ता हिला परीक्षेसाठी कॉलेजला सोडण्यासाठी गेला होता. तिला सोडून पुन्हा घरी परत येत होता.
दरम्यान, बसस्टॅंडकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर टँकर (केए २८, टीडी ३८९७) ला आदर्शकुमार ओव्हरटेक करत होता. यावेळी त्याची दुचाकी रस्त्याकडेच्या दुभाजकाला धडकून दुचाकीचालक ट्रॅक्टर टॅंकरच्या चाकात पडल्याने आदर्शकुमारच्या डोक्यास गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.
वर्दळीच्या मार्गावर अपघात घडल्याने घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची नोंद संकेश्वर पोलिसांत झाली असून, वडील संजय गुप्ता (रा. संकेश्वर) यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालक अक्षय करोशी (रा. नेर्ली) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. आदर्शकुमार हा एस. एस. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.