शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत आज गूळ सौदे बंदच राहणार-: हमालीवाढीचे त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:21 IST

समितीचे सभापती बाबासाहेब लाड, उपसभापती संगीता पाटील, संचालक कृष्णात पाटील, नेताजी पाटील, सचिव मोहन सालपे यांनी दोन्ही घटकांशी चर्चा केली; पण त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर शनिवारी रात्री समिती पदाधिकाऱ्यांनी आमदार विनय कोरे यांची भेट घेतली.

ठळक मुद्देविनय कोरे यांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही घटक आपल्या भूमिकेवर ताठर

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत आज, सोमवारी गुळाचे सौदे बंदच राहणार आहेत. हमाल व खरेदीदार यांच्यात हमालीवाढीवरून त्रांगडे झाले असून, आमदार विनय कोरे यांनी हस्तक्षेप करून दोन्ही घटक आपापल्या भूमिकांवर ताठर राहिल्याने पेच निर्माण झाला आहे. 

हमालीत १० टक्के वाढ द्यावी, या मागणीसाठी हमाल व खरेदीदार यांच्यात वाद सुरू आहे. यावर गेली तीन-चार दिवस चर्चा सुरू असतानाच शनिवारी (दि. १६) दुपारी हमालांनी काम बंद केले. त्यानंतर प्रकरण चिघळत गेले आणि आता चर्चाच करायची नाही, असा सूर खरेदीदारांनी आळवला. समितीचे सभापती बाबासाहेब लाड, उपसभापती संगीता पाटील, संचालक कृष्णात पाटील, नेताजी पाटील, सचिव मोहन सालपे यांनी दोन्ही घटकांशी चर्चा केली; पण त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर शनिवारी रात्री समिती पदाधिकाऱ्यांनी आमदार विनय कोरे यांची भेट घेतली. त्यानीही शाहूपुरी मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम खाडे, अतुल शहा; तर हमालांचे प्रतिनिधी बाबूराव खोत यांच्याशी चर्चा केली; तरीही ते आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने रविवारी यावर तोडगा निघालाच नाही. 

शनिवारची आवक मार्केट यार्डातच पडून असल्याने आज, सोमवारी खरेदीदारांची गूळ खरेदी करण्याची मानसिकता नाही; तर १० टक्के हमालीवाढीचे परिपत्रक काढले तरच काम सुरू करू, अशी भूमिका हमालांनी घेतल्याने सोमवारी सौदेच बंद ठेवण्याचा निर्णय समितीच्या प्रशासनाने घेतला आहे. 

 

दोन्ही घटकांशी चर्चा केली; पण ते आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने आज, सोमवारी सौदे होणार नाहीत; त्यामुळे शेतकऱ्यांनी गुळाची आवक करू नये. - बाबासाहेब लाड (सभापती, बाजार समिती)

 

करारानुसार १० टक्के वाढ देणार नसाल तर आता १५ टक्के द्या, पुढील तीन वर्षे दरवाढ मागत नाही. एवढीच आमची मागणी आहे. महापुरामुळे गावाकडे अगोदरच नुकसान झाले. आम्हाला दरवाढ नको, मदत म्हणून हा निर्णय घ्या, एवढीच विनंती आहे. - बाबूराव खोत (हमाल प्रतिनिधी) 

 

टॅग्स :Vinay Koreविनय कोरेMarket Yardमार्केट यार्ड