शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

इस्लामपुरात प्लास्टिकपासून विटांची निर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:35 IST

युनूस शेख । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : भारतीय सैन्यदलात कार्यरत असणारे खुजगाव (ता. तासगाव) येथील सचिन देशमुख यांनी ...

युनूस शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : भारतीय सैन्यदलात कार्यरत असणारे खुजगाव (ता. तासगाव) येथील सचिन देशमुख यांनी इस्लामपूर नगरपालिकेच्या कचरा डेपोवर संशोधनाचा आविष्कार दाखवत, प्लास्टिकच्या कचऱ्यापासून विटा बनविल्या आहेत. ऊन, वारा, पाऊस याचा कोणताही परिणाम न होणाºया आणि पर्यावरणाचे संतुलन साधणाºया या विटा लष्कराच्या अभेद्य बंकरसाठी वापरल्या जाणार आहेत.सचिन संदिपान देशमुख शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण झाले आहे. २०१० मध्ये ते लष्करात भरती झाले आहेत. सध्या राजस्थानमधील उधमपूर येथे सेवा बजावत आहेत. पर्यावरणाचा समतोल साधला गेला पाहिजे, या विचाराने पाच वर्षापासून ते प्लास्टिक कचºयावर संशोधन करत आहेत. त्यांना कर्नल ए. सी. कुलकर्णी व कर्नल करन धवन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सांगली जिल्ह्यात त्याची निर्मिती करण्यासाठी उद्योजक माधव कुलकर्णी, शिवाजी देशमुख, सतीश माळी, गणेश माळी, सांगलीचे आयुक्त रवींद्र खेबूडकर, इस्लामपूरचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी मदतीचा हात दिला.प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी त्या प्लास्टिकला आकार देऊन त्याच्या प्रकारानुसार वेगळे करावे लागते. प्लास्टिक कापून स्वच्छ करणे, त्याचे दाणे बनवणे अशाप्रकारे वर्गीकरण करणे जरुरीचे असते. मात्र प्लास्टिक कचºयाचे कसलेही वर्गीकरण न करता विटा बनविणारे ‘वेस्ट प्लास्टिक प्रॉडक्ट मशीन’ हे देशमुख यांच्या संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. या यंत्राच्या तंत्रज्ञानासाठी त्यांनी पेटंट केले आहे. ‘प्लास्टिक वेस्ट कंट्रोल प्रोजेक्ट’ या नावाने ते हे संशोधन जगापुढे आणत आहेत.प्लास्टिक कचरा जसा आला, तसा या यंत्रामध्ये घालून विशिष्ट तापमानास प्लास्टिकचे अर्धद्रव स्वरूपात रूपांतर करून यंत्राच्या साहाय्याने विटा, रस्ते दुभाजकाचे ब्लॉक, पेव्हिंग ब्लॉक अशी उत्पादने बनवणे शक्य आहे. या विटांच्या क्षमतेविषयी देशमुख यांनी न्यूटनचा चुंबकीय सिद्धान्तही वापरला आहे. या विटांची क्षमता २४ न्यूटन प्रति मि.मी.चौरस फुटापेक्षाही जास्त आहे.देशमुख यांनी निर्मिती केलेल्या यंत्रामध्ये १५० मायक्रॉनपेक्षा कमी घनतेच्या कोणत्याही प्रकारातील प्लास्टिकवर प्रक्रिया करता येते. या यंत्राची क्षमता प्रतिदिन ५० ते १०० किलो प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करू शकेल इतकी आहे. प्लास्टिक कचºयाचे वर्गीकरण न करता कॉलनी, अपार्टमेंट, खेडेगाव अशा प्रत्येक ठिकाणी हे यंत्र बसवले, तर प्लास्टिक कचºयाचा डोकेदुखी बनलेला विषय अर्थप्राप्ती करून देऊ शकतो, हे देशमुख यांनी सिद्ध केले आहे.आतापर्यंत ४ पेटंट रजिस्टरसचिन देशमुख यांनी गणित व इंजिनिअरिंग या क्षेत्रात संशोधन केले आहे. त्यांनी आतापर्यंत ४ पेटंट रजिस्टर केली आहेत. आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून त्यांचे ९ शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. गणित विषयामध्ये संशोधन करुन ‘संबंधांचे सर्व गणित’ नावाचे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केले आहे.