शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: फसवणुकीचा गुन्हा दाखल करत नाही, अधिकाऱ्याच्या नावे सात लाखांची लाच मागितली; हवालदार, कॉन्स्टेबलवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 11:43 IST

अटकेची चाहूल लागताच दोघेही पळाले

कोल्हापूर : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी प्रभारी अधिकाऱ्याच्या नावे सात लाखांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातील हवालदार आणि कॉन्स्टेबलवर सोमवारी (दि. ९) त्यांच्याच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हवालदार नीतेश मारुती कांबळे (रा. दऱ्याचे वडगाव, ता. करवीर) आणि कॉन्स्टेबल एजाज महंमद शेख (रा. करनूर, ता. कागल) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. अटकेची चाहूल लागताच दोघे पळाले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात १६ जानेवारी २०२६ रोजी फसवणुकीचा तक्रार अर्ज आला होता. हवालदार नीतेश कांबळे याने त्यातील संशयित आरोपीला पोलिस ठाण्यात बोलवून चौकशी केली. त्यानंतर कॉन्स्टेबल एजाज शेख याने संशयितास बोलवून गुन्हा दाखल न करण्यासाठी प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक तबस्सूम मगदूम यांच्या नावे सात लाखांच्या लाचेची मागणी केली.चार लाखांवर तडजोड होऊन दोन दिवसांत लाचेची रक्कम पोहोच करण्याचे ठरले होते. याबाबत संशयिताने त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. याची पडताळणी करून लाच स्वीकारताना सापळा रचण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र, त्यांनी लाच स्वीकारली नाही.अखेर लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांचे पथक अटकेसाठी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गेले होते. अटकेची चाहूल लागताच कांबळे आणि शेख यांनी पळ काढला. दोघांचा शोध सुरू असून, त्यांच्या घरांची झडती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक पाटील यांनी दिली.प्रभारी अधिकाऱ्यांच्या सहभागाची चौकशी होणारगोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक तबस्सूम मगदूम यांच्या नावे लाचेची मागणी झाली होती. त्यामुळे त्याचा यात सहभाग आहे काय? याची पडताळणी करण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. सहभागाचे पुरावे मिळाल्यास त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Cops booked for bribery in false case cover-up.

Web Summary : Two Kolhapur police officers are booked for demanding a bribe to drop a fraud case. The officers allegedly sought ₹7 lakh in the name of their superior. An investigation is underway to determine if the superior was involved.