लघुशंका करू नये, तरुणाच्या डोक्यात फोडली बाटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 16:24 IST2019-11-29T16:22:15+5:302019-11-29T16:24:27+5:30

कोल्हापूर : राजारामपुरी परिसरातील बागे मंडळ, कुरणे गल्ली येथे किरकोळ कारणावरून बिअरची बाटली डोक्यात फोडल्याने उमेश श्रीमंत साळुंखे (वय ...

 Bottle burst into the young man's head | लघुशंका करू नये, तरुणाच्या डोक्यात फोडली बाटली

लघुशंका करू नये, तरुणाच्या डोक्यात फोडली बाटली

ठळक मुद्देत्यानंतर त्याला ठार मारण्याची धमकी देऊन तिघेही पसार झाले.

कोल्हापूर : राजारामपुरी परिसरातील बागे मंडळ, कुरणे गल्ली येथे किरकोळ कारणावरून बिअरची बाटली डोक्यात फोडल्याने उमेश श्रीमंत साळुंखे (वय २१, रा. मेन रोड, यादवनगर) हा जखमी झाला. गुरुवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी संशयित गब्बर हुसेन मुल्ला (वय ४०), मुजमील कुरणे (३५), बबलू मुल्ला (३२, तिघेही रा. सदर बाजार) यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी उमेश साळुंखे हे बागे मंडळ, कुरणे गल्ली येथील चौकात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता थांबले होते. त्यावेळी संशयित तिघेजण मोटारसायकलवरून त्या ठिकाणी आले. त्यांनी जुबेर महाबरी कुठे आहे, अशी विचारणा केली. तो गावात गेल्याचे साळुंखे याने सांगितले. त्यावेळी संशयित मुजमिल कुरणे हा त्या ठिकाणी लघुशंका करीत होता. या ठिकाणी लघुशंका करू नये, असे उमेश साळुंखे याने बजावले. त्याचा राग आल्याने गब्बर हुसेन याने उमेश साळुंखे याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याने उमेश गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला ठार मारण्याची धमकी देऊन तिघेही पसार झाले.
 

Web Title:  Bottle burst into the young man's head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.