शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून दोघींचे अर्ज

By admin | Updated: July 2, 2015 00:44 IST

गडहिंग्लज नगरपालिका : विरोधी आघाडीतर्फे राजेश बोरगावे यांचा अर्ज दाखल

गडहिंग्लज : अपेक्षेप्रमाणे गडहिंग्लजच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे दोन अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदाच्या दावेदार ज्येष्ठ नगरसेविका अरुणा शिंदे व सरिता गुरव या दोघींचेही अर्ज राष्ट्रवादीतर्फे दाखल झाले. विरोधी आघाडीतर्फे माजी नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. राष्ट्रवादीतर्फे शिंदे व गुरव यापैकी कुणाला संधी मिळणार, हे माघारी दिवशी शुक्रवारी (दि. ४) स्पष्ट होईल.पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीचे नऊ, तर विरोधी जनता दल - जनसुराज्य - काँगे्रस आघाडीचे आठ नगरसेवक आहेत. काठावरील बहुमतामुळे गतवेळचा अनुभव लक्षात घेऊन राष्ट्रवादीने यावेळीही इच्छुक दोघींचेही अर्ज दाखल केले.सकाळी ‘राष्ट्रवादी’चे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी येथील विश्रामगृहावर राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. प्रत्येकाचे वैयक्तिक मत जाणून घेतले. तब्बल दोन तासांच्या चर्चेअंती दोघींचे अर्ज भरण्याची सूचना त्यांनी दिली. यावेळी प्रभारी नगराध्यक्षा कावेरी चौगुले, राष्ट्रवादीचे गटनेते रामदास कुराडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसंत यमगेकर, युवा शहराध्यक्ष सुनील गुरव, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदय जोशी, शिक्षण मंडळ सभापती सुरेश कोळकी, सतीश पाटील, राहुल पाटील, सुनील चौगुले, बाळासाहेब घुगरे, आदींसह सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘गडहिंग्लज’कर अपवाद !कोल्हापूरचा महापौर, कागल-मुरगूड व पन्हाळ्याचा नगराध्यक्ष निवडताना आमदार मुश्रीफ यांचा शब्द प्रमाण मानला जातो. त्याठिकाणच्या निवडीदेखील एकमतानेच होतात. मात्र, ‘गडहिंग्लज’ याला अपवाद राहिले आहे. येथील निवडीत स्वत: लक्ष घातले, तरी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांत ‘एकमत’ घडविण्यासाठी खूप कष्ट पडतात. याचा अनुभव त्यांना आज पुन्हा एकदा आला.यावेळी दोन..गतवर्षी मावळत्या नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांच्यासह शिंदे व गुरव यांनीही दावा केला होता. त्यामुळे तिघींंचेही अर्ज भरले होते. यावेळीदेखील शिंदे व गुरव यांच्यात एकमत न झाल्यामुळेच दोघींचेही अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विरोधकांच्या खेळीवरच निर्णय घेतला जाणार आहे.