कर्जदारांचे हप्ते माफ व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:17 IST2021-06-11T04:17:37+5:302021-06-11T04:17:37+5:30

कोल्हापूर : कोरोनामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तरी शासनाच्या विविध महामंडळांकडून नागरिकांनी घेतलेल्या कर्जाचे कोरोना काळातील ...

Borrowers' installments should be waived | कर्जदारांचे हप्ते माफ व्हावेत

कर्जदारांचे हप्ते माफ व्हावेत

कोल्हापूर : कोरोनामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तरी शासनाच्या विविध महामंडळांकडून नागरिकांनी घेतलेल्या कर्जाचे कोरोना काळातील हप्ते माफ करण्यात यावेत अशी मागणी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत नागरिकांना आर्थिक ताण सोसावा लागत आहे. त्यामुळे आण्णासाहेब पाटील महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जाती, अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या कर्जांचे कोरोना काळातील कर्जदारांचे हप्ते माफ व्हावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी कार्याध्यक्ष समाधान बनसोडे, शहर अध्यक्ष भारत कोकाटे, संजय गुदगे, प्रभाकर माने आदी उपस्थित होते.

--

Web Title: Borrowers' installments should be waived