शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘बॉम्ब’ फुटलाच नाही

By admin | Updated: July 1, 2015 00:38 IST

महापौर निवड : राष्ट्रवादी निवांत, कॉँग्रेसमध्ये निवडीनंतरही घालमेल

संतोष पाटील -कोल्हापूरमहापौर निवडीसाठी जिल्हा बॅँकेचे राजकारण केंद्रबिंदू ठरले. प्रा. जयंत पाटील यांच्या स्वीकृत संचालकपदी निवडीस उशीर झाला असता तर कदाचित महापौरपदाची निवडणूक अटळ ठरली असती. जनसुराज्य पक्षाने महापौरपदाचा अर्ज नेऊन तयारीची चाहूल दिली होती. दुपारी प्रा. जयंत पाटील यांच्याकडून ‘काळजी करू नका, चर्चेतून मार्ग काढू’ असा निरोप आल्यानंतरच भाजप-शिवसेनेच्या मदतीने गोळाबेरीज करून शनिवारी महापौर निवडीवेळी ‘बिनआवाजाचा बॉम्ब’ फोडण्याची तयारी शांत झाली. मात्र, महापौर निवडीनंतर व पूर्वीही राष्ट्रवादी निवांत, तर कॉँग्रेसअंतर्गत घालमेल सुरूच असल्याचे चित्र आहे.विधानसभा निवडणुकीनंतर सतेज पाटील यांना एकटे पाडून त्यांची कोंडी करण्याचा डाव महापालिकेसह जिल्ह्याच्या सर्व सत्ताकेद्रांत सुरू आहे. यातूनच माजी महापौर माळवी यांना आमदार महादेवराव महाडिक समर्थकांनी खतपाणी घालत राजीनामा तब्बल पाच महिने लांबविला. दरम्यान, केडीसीसी बॅँकेत पाटील यांची कोंडी करीत त्यांना माघार घेण्यास भाग पाडले. याचा पलटवार म्हणून सतेज पाटील यांनी प्रा. जयंत पाटील यांच्याविरोधात फळी उभी करीत ‘सरां’ना बॅँकेचा पुढील दरवाजाच बंद केला. दरम्यान, शासन व न्यायालयाच्या दणक्याने महापौरपदाचा मार्ग रिकामा झाला. चार महिन्यांसाठी कोणाला दुखवायचे असा यक्षप्रश्न पाटील यांच्यापुढे होता. ढोणुक्षे, डकरे की सूर्यवंशी असा निर्णय घेण्याची पाटील यांची कोंडी झाली. विरोधकांनीही महापौर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली. पडद्यामागे जोरदार घडामोडी सुरू झाल्या. गटांतर्गत नाराजी थोपविण्यासह कॉँग्रेसच्या वाट्याला आलेले महापौरपद टिकविण्यासाठी सतेज पाटील समर्थकांना गेल्या २४ तासांत कस लावावा लागला. शारंगधर देशमुख व सचिन चव्हाण हे सतेज पाटील यांचे खंदे समर्थक प्रा. पाटील यांच्याशी चर्चा करून समेटासाठी सरसावले. दुपारी प्रा. पाटील यांची ‘के.डी.सी.सी.’च्या स्वीकृत संचालकपदी निवड जाहीर होताच महापौरपदाचाही तिढा सुटला.कॉँग्रेस-राष्ट्रवादी व जनसुराज्य आघाडी अभेद्य आहे. आघाडीत बिघाड करण्याचा क धीही हेतू नव्हता आणि नाही. निवडणुकीच्या तोंडावर कटुता निर्माण होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली. महापौर निवडीचा निर्णय हा सर्वस्वी कॉँग्रेसचा आहे. त्यामुळे मी पडद्यामागे हालचाली किंवा घडामोडी करण्याचा प्रश्नच येत नाही. - प्रा. जयंत पाटील, नगरसेवकतिढा सुटला तरी पेच कायममहापौरपदाचा तिढा सुटला तरी समर्थकांची नाराजी दूर करण्याचा प्रश्न सतेज पाटील यांच्यापुढे ‘जैसे थे’ आहे. निवडणुकीच्या तोंडावर औटघटकेचा महापौर करताना नंदकुमार सूर्यवंशी व सुरेश ढोणुक्षे यांची नाराजी पाटील यांना ओढवून घ्यावी लागली. महापौर निवडीनंतर राष्ट्रवादी निवांत झाली. महापौरपदाचा तिढा सुटला तरी पेच कायम असल्याचे सतेज पाटील गटातील चित्र आहे.काँग्रेस कमिटीत विधानसभा निवडणुकीनंतर प्रथम गर्दीविधानसभा निवडणुकीनंतर कॉँग्रेस कमिटी कार्यालयात कार्यकर्त्यांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे. महापौर निवडीच्या मुलाखती कॉँग्रेस कमिटीत आयोजित केल्याने गेल्या काही महिन्यांनंतर प्रथमच कॉँग्रेस कमिटी कार्यालय नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलले होते.